CoronaVirus: केईएममधील स्वच्छता कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

CoronaVirus: केईएममधील स्वच्छता कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

कोरोना व्हायरस

मुबंईमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मुंबईतील प्रसिद्ध केईएम रुग्णालयातील Neonatal Intensive Care Unit (NICU) मधील स्वच्छता कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाची लागण झालेल्या स्वच्छता कर्मचाऱ्याचे वय ५० वर्ष असून तो धारावी परिसरातील मुस्लिम नगरमधील रहिवासी आहे. या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या संशयित ५ व्यक्तींना धारावीतील राजीव गांधी स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये ठेवण्यात आले आहे.

पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ

धारावीतील कोरोनाग्रस्तांची संख्या ७ होती. मात्र त्यात बुधवारी आणखी तीन रुग्णांची नव्याने भर पडली आहे. आशियातील सर्वात मोठी झोडपट्टी असलेल्या धारावीमध्ये बुधवारी पुन्हा तीन कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या तीन नव्या रूग्णांमुळे ही संख्या आता १० झाली आहे. दरम्यान, धारावीतील कोरोनाग्रस्ताचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता.

एकीकडे धारावीतील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १० झाली आहे तर दुसरीकडे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वरळी कोळीवाडा, वरळी, लोअर परेल आणि धारावीतील काही भाग संपूर्ण सील करण्यात आला आहे. तिथल्या नागरिकांना घरात क्वारंटाइन करण्यात आले आहे.


बेहरामपाड्यात कोरोनाचा शिरकाव; मुंबई महापालिकेसमोरील आव्हान वाढणार!
First Published on: April 8, 2020 7:08 PM
Exit mobile version