मुख्यमंत्री उद्यापासून प्रचाराच्या मैदानात उतरणार

मुख्यमंत्री उद्यापासून प्रचाराच्या मैदानात उतरणार

देवेंद्र फडणवीस

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपली आहे. उद्यापासून मुख्यमंत्री प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. मुख्यमंत्री उद्यापासून राज्यभर प्रचार दौरे करणार आहेत. आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर कोअर कमिटीची बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

वर्षा बंगल्यावर बैठकांचा सपाटा

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर बैठकांचा सपाटा सुरू आहे. आताच कोअर कमिटीची बैठक संपली. त्यानंतर पुन्हा अडीच वाजता निवडणूक समितीची बैठक होणार आहे. आज सर्व बैठका संपवून उद्यापासून मुख्यमंत्री राज्यभरात प्रचार दौरे सुरु करणार आहेत. त्यामुळे राज्यभरात उद्यापासून प्रचाराचा नारळ फुटणार आहे.

दिल्लीत केंद्रीय संसदीय बोर्डाची बैठक

आगामी निवडणुकीत लोकसभा मतदारसंघ प्रमुख, राज्यसभा खासदार आणि विधानपरिषद आमदारांच्या जबाबदारी निश्चित करण्यासाठी करणार आहेत. त्याचसोबत आचारसंहितेचे पालन करता सोशल मीडियावर प्रचार कसा करावा यावरही चर्चा होणार आहे. उमेदवारी यादी निश्चिती आधी केंद्रीय संसदीय बोर्ड बैठक बोलावणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे दिल्लीला जाणार आहेत.

First Published on: March 14, 2019 2:48 PM
Exit mobile version