Coronavirus: कोरोना विरोधात लढण्यासाठी नवीन बँक खाते; मुख्यमंत्र्यांकडून मदतीचे आवाहन

Coronavirus: कोरोना विरोधात लढण्यासाठी नवीन बँक खाते; मुख्यमंत्र्यांकडून मदतीचे आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने काटेकोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत. यासाठी आवश्यक असलेल्या निधी संकलनासाठी सरकारने विशेष मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोष निर्माण केला आहे. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते निर्माण केले असून या खात्याचा क्रमांक – 39239691720 असा असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे खाते स्टेट बँकेच्या फोर्ट शाखेत उघडण्यात आले असून खात्याचा आयएसएफ क्रमांक SBIN0000300 असा असल्याचे सांगण्यात आले आहे. या खात्यात सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे.

 

टाटा ग्रुपकडून १५०० कोटींची मदत

कोरोना विरोधात उपाययोजना आखण्यासाठी टाटा ग्रुपने आज मोठी मदत जाहीर केली. टाटा ग्रुपने सुरुवातील ५०० कोटींची मदत दिल्यानंतर पुन्हा अतिरीक्त १०० कोटी देण्याचे जाहीर केले. आता ही मदत १५०० कोटी आहे. एवढा भरीव निधी दिल्यानंतर अनेकांकडून टाटा ग्रुपच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले जात आहे.

 

 

First Published on: March 28, 2020 8:26 PM
Exit mobile version