आरेतील झाडांच्या कत्तलीची चौकशी करण्यासाठी समिती केली स्थापन

आरेतील झाडांच्या कत्तलीची चौकशी करण्यासाठी समिती केली स्थापन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडच्या कामाला स्थगित दिली. मात्र स्थगिती दिल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी आरेतील झाडांच्या कत्तलीची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. येत्या १५ दिवसांमध्ये या समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश दिली आहे. तसंच ही समिती अर्थ विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर आरे कारशेडला स्थगिती दिली असली तरी हा प्रकल्प सुरुच राहणार असल्याचं स्पष्ट केलं होत. तसंच या आरेच्या आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे देखील मागे घेण्याचे आदेश ठाकरे यांनी दिले होते. आता आरे प्रकरणी चौकशी करण्यासाठी आज उद्धव ठाकरे यांनी समिती स्थापन केली. आरेतील कारशेड उभारण्यासाठी कत्तल करण्यात आलेल्या २१०० झाडांची चौकशी होणार आहे.

सुत्राच्या माहितीनुसार, कुणाच्या आदेशावरून ही झाडं तोडण्यात आली? एवढी झाडं तोडण्याची गरज होती का? आरे ऐवजी कारशेडसाठी दुसरा पर्याय शोधता आला नसता का? ही झाडं रात्रीच्या वेळसं तोडण्याची गरज होती का? अशा प्रश्नांचा आढावा ही स्थापन केलेली समिती घेणार आहे. तसंच अजून किती झाडं तोडण्याची गरज आहे? झाडं न तोडताही काही पर्याय आहे का? अशा प्रकारे शोधही समिती घेणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राचं या समितीकडे लक्ष लागलं आहे.


हेही वाचा – उद्या उद्धव ठाकरे सरसकट कर्जमाफीची घोषणा करणार?


 

First Published on: December 11, 2019 11:05 PM
Exit mobile version