कोरोनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाढदिवस साजरा करणार नाहीत

कोरोनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाढदिवस साजरा करणार नाहीत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

‘सध्याच्या कोरोना परिस्थितीत आपण वाढदिवस साजरा करणार नसून कुणीही कार्यालयात किंवा निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह धरू नये. तसेच हार तुऱ्यांऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ देणगी द्यावी. नियम पाळून आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत’, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा २७ जुलै रोजी वाढदिवस आहे. यादिवशी कुणीही जाहिरात फलक, भित्तीपत्रके लाऊ नये किंवा गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले की, मला दिलेल्या शुभेच्छा या सर्व कोविड योद्ध्यांना समर्पित करीत आहे. गेल्या ४ महिन्यांभपासून राज्य सरकार नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने कोरोनाची लढाई लढत आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे काही चांगले परिणामही दिसत आहेत. कोरोनाचा धोका टळलेला नाही, उलटपक्षी आता आपल्याला अधिक सावध राहून नियमांचे पालन करायचे आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जन आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत, मोठ्या प्रमाणावर रक्तदान, प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन केले आहे.

First Published on: July 23, 2020 5:29 PM
Exit mobile version