सायन रुग्णालयातील प्रसूतीगृहात झुरळांचा सुळसुळाट

सायन रुग्णालयातील प्रसूतीगृहात झुरळांचा सुळसुळाट

सायन रुग्णालय

मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याच्यावेळी रुग्णांना दिले जाणारे कपडे न मिळाल्याने रुग्णांच्या ४० शस्त्रक्रिया रद्द झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा सायन रुग्णालय चर्चेत आले आहे. सायन रुग्णालयाच्या प्रसूतीगृहात झुरळांचा सुळसुळाट होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा व्हिडिओ सायन रुग्णालयातील प्रसूती वॉर्डमधला असून या वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात झुरळ असल्याचे दृश्य दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा सायन रुग्णालयाच्या स्वच्छतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत असून प्रशासनाच्या या बेजबादारपणामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

प्रसूतीगृहात झुरळांचा सुळसुळाट

सायन रुग्णालयाच्या प्रसूतीगृहात झुरळांचा सुळसुळाट होत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बाळांच्या रडण्याचा आवाज येत असल्याने हा व्हिडिओ प्रसूतीगृहातला असल्याचे समोर आले आहे. रुग्णालयात रुग्णाच्या बेडच्या बाजूला औषध आणि रुग्णाचे समान ठेण्यासाठी डॉवर दिला जातो. त्या डॉवरमध्ये असंख्य झुरळांचा सुळसुळाट असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहिला मिळत आहे. यामुळे बाळंतीण आणि बाळ यांचे आरोग्य धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.

येथे केल होत झुरळांच शुटींग

गेल्या वर्षी ठाणे पालिकेच्या एका रुग्णालयात झुरळांचा सुळसुळाट असलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ठाणे पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झुरळांचा सुळसुळाट होत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून आले होते. मात्र प्रशासनाने अनेक वेळा तक्रारी करुन देखील त्याकडे दुर्लक्ष होत होते. या झुरळांना कंटाळून या रुग्णालयातील एका वैतागलेल्या डॉक्टरने थेट रुग्णाचं ऑपरेशन थांबवून झुरळांचं शुटींग केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

वाचा – या कारणामुळे सायन रुग्णालयातील ४० शस्त्रक्रिया झाल्या रद्द

First Published on: September 26, 2018 11:48 AM
Exit mobile version