राज ठाकरेंच्या घरासमोर आत्महत्येचा प्रयत्न, तरूणाने लिहिली सुसाईड नोट

राज ठाकरेंच्या घरासमोर आत्महत्येचा प्रयत्न, तरूणाने लिहिली सुसाईड नोट

प्राध्यापक, एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट्स

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या बंगल्याबाहेर आज म्हणजेच २७ जून रोजी दुपारी एका तरूण प्राध्यापकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भारत गिते असे या व्यक्तीचे नाव असून आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्याने एक सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. या नोटमध्ये असं पाऊल उचलण्याचं कारण त्यांनी नमूद केलं होतं. दरम्यान, भारत गितेंना तातडीने हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

प्राध्यापकाने लिहिलेली सुसाईड नोट

 

भारत गिते वांद्र्याच्या एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्राध्यापकाची नोकरी करतात. मात्र, ‘माझ्या कॉलेजच्या प्राचार्य हे कॉलेज बंद करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी त्यांनी कॉलेजमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा छळ सुरू केला आहे. त्यांच्या जाचाला कंटाळून याआधीही वैराळ नावाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. आता मीही आत्महत्या करतोय. माझ्या मृत्यूनंतरही कॉलेज बचावची मोहीम सुरूच ठेवावी’, असं त्यांनी लिहिलं आहे.

प्राध्यापकाने लिहिलेली सुसाईड नोट

 

या सुसाईड नोटमध्ये कॉलेजच्या प्राचार्या आणि इतर शिक्षकांचीही नावे घेण्यात आली आहेत. ‘कॉलेज वाचवण्यासाठी मी करत असलेल्या प्रयत्नांमुळे मला टार्गेट करून त्रास दिला जात होता. त्यामुळे मी आता हे पाऊल उचलले आहे. माझ्यानंतर माझ्या मुलाची काळजी मित्रांनी घ्यावी आणि माझे अवयव गरीबांना दान करण्यात यावेत’, अशा आशयाचा मजकूर या पत्रामध्ये लिहिण्यात आला आहे.

दरम्यान, भारत गिते यांनी केलेल्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, याविषयी अधिक माहिती मिळू शकलेली नाही. सध्या त्यांच्या भावाने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केले आहे.

First Published on: June 27, 2018 12:15 PM
Exit mobile version