इतर रेडझोनच्या तुलनेत वरळीतील कोरोना रुग्णांच्या दुप्पटवाढीचा वेग कमी- महापौर

इतर रेडझोनच्या तुलनेत वरळीतील कोरोना रुग्णांच्या दुप्पटवाढीचा वेग कमी- महापौर

मुंबईतील रेडझोन मध्ये असलेल्या जी/ दक्षिण विभागामध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या विभागातील दुप्पट वाढीचा वेग हा वाढला नसून इतर रेडझोन विभागाच्या तुलनेत हा वाढीचा दर पंधरा दिवसावर आला असल्याचे सांगितले आहे.

जी/दक्षिणमध्ये रुग्णसंख्या दुप्पट वाढीचा वेग वाढला

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमवारी जी/दक्षिण विभाग कार्यालयाला भेट देऊन विभागातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा सहाय्यक आयुक्त शरद उघडे व त्यांच्या संपूर्ण टीमकडून आढावा घेतला. यावेळी त्यांनी जी/दक्षिण विभागामध्ये कोरोना रुग्णसंख्या दुप्पट वाढीचा वेग हा वाढला असल्याचे जे बोलल्या जात आहे, ते चुकीचे असून जी/ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त व त्यांची संपूर्ण टीम कोरोनाच्या नियंत्रणासाठी झटून काम करीत असल्याचे महापौरांनी सांगितले.

महापौरांनी यावेळी विभागामध्ये करण्यात आलेल्या उपाययोजनांचा व सुविधांचा आढावा घेतला. तसेच कुठल्याही परिस्थितीत सर्वांनी मिळून रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करून नागरिकांनी सुरक्षितरित्या घरीच राहण्याचे आवाहन महापौरांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत महापालिका आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले उपस्थित होते. मुंबईत सर्वाधिक कारोनाचे रुग्ण हे वरळी विभागातच असून आतापर्यंत ही संख्या हजाराच्या आसपास पोहोचल्याचे समजते.


मुंबईतील लॉकडाऊन उघडण्याची भाजप मुंबई अध्यक्षांची मागणी
First Published on: May 4, 2020 9:23 PM
Exit mobile version