ठाण्यातील रखडलेले दोन एसआरए प्रकल्प अखेर मार्गी

ठाण्यातील रखडलेले दोन एसआरए प्रकल्प अखेर मार्गी

ठाणे शहरातील रखडलेल्या दोन एसआरए प्रकल्पांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यामुळे गेल्या अनेक काळापासून रखडलेल्या या दोन प्रकल्प लवकरचं सुरु होणार आहे. तसेच प्रकल्पबाधित रहिवाशांचे थकलेले भाडेही धनादेशाच्या स्वरुपात मिळाले आहे. राज्याचे गृह निर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रयत्नांनी व राष्ट्रवादीचे ठाणे शहाराध्य आनंद परांजपे यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला आहे. ठाण्यातील खोपटच्या ब्राम्हणदेव सोसायटी आणि माजीवड्यातील सम्राट अशोक नगर या दोन झोपडपट्टयांचे एसआरए योजनेंतर्गत विकासकामे करण्यात येत आहे. यातील माजीवड्यातील सुमारे ४५० झोपडपट्या तर खोपटच्या ब्राम्हणदेव सोसायटीतील ४५ रहिवाश्यांचे या योजनेअंतर्गत विकास होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही गृहनिर्माण प्रकल्पांचे काम थांबले होते. तसेच विकासकाकडून देण्यात येणारे घर भाडेही मिळत नसल्याने रहिवाशी हवालदिल झाले होते. त्यानंतर या दोन्ही प्रकल्पबाधित नागरिकांनी शहराध्य परांजपे भूमिका मांडली त्यानंतर पंराजपे यांनी गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांची भेट घेत विकासक आणि रहिवाशी यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत विकासकाला आव्हाडांनी प्रकल्प तत्काळ सुरु करा आणि रहिवाशांना त्यांचे घरभाडे अदा करा करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्याप्रमाणे रहिवाश्यांना त्यांचे घरभाड्याचे धनादेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी कार्यकारी अभियंते नितीन पवार आणि अभियंते राजकुमार पवार यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

यावेळी डॉ. आव्हाड यांनी सांगितले की, ठाण्यातील अनेक वस्त्यांचा एसआरए मार्फत होणारा विकास थांबला असल्याचे चित्र दिसून येत आहे. खोपट येथील ब्राम्हणदेव गृहनिर्माण संस्था व माजीवडा येथील सम्राट अशोक नगरचे तथागत आणि समभाव गृहनिर्माण संस्था येथील रहिवाशांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आनंद परांजपे यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे रहिवाशी आणि विकासक यांच्यात चर्चा घडवून हा प्रश्न निकाली काढला आहे. सध्या बांधकाम व्यावसायात गती येत आहे. त्यामुळे त्याचा फायदा घेऊन विकासक हे प्रकल्प लवकर पूर्ण करतील, अशी अपेक्षा आहे.


 

हेही वाचा – धनंजय मुंडे व्हिडिओ कॉल करून शरीर संबंधाची मागणी करायचे – रेणू शर्मा

 

First Published on: January 15, 2021 9:12 PM
Exit mobile version