Video: मतदान केंद्रातील टेबलवर काँग्रेसची जाहिरात; भाजपचा आक्षेप

Video: मतदान केंद्रातील टेबलवर काँग्रेसची जाहिरात; भाजपचा आक्षेप

डोंबिवलीच्या मतदान केंद्रावर काँग्रेसची जाहीरात

मतदान केंद्रावरील टेबलवरील दर्शनी भागात काँग्रेसची जाहिरात असलेले वृत्तपत्र लावण्याचा प्रकार डोंबिवलीत घडल्याने, भाजपने यावर आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात भाजपने निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात झोनल अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे.

 

डोंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी शाळेतील बूथ क्रमांक १८८ मधील मतदान केंद्रावरील एका टेबलवर हा प्रकार घडला. भाजपचे डोंबिवली पश्चिम अध्यक्ष प्रज्ञेश प्रभूघाटे यांच्या निदर्शनास ही बाब लक्षात येताच त्यांनी यावर आक्षेप घेत निवडणूक अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. मुद्दामूनच हे पेपर लावण्यात आल्याचा आरोप करीत त्यांनी निवडणूक अधिका-यांना फैलाव घेत जाब विचारला याप्रकरणी घाटे यांनी संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची झोनल अधिकारी शैलेश मळेकर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे

First Published on: April 29, 2019 8:34 PM
Exit mobile version