चेहरा पाहूनच राजकारणात घेतलं; शेट्टींची प्रतिस्पर्धी उर्मिलावर टीका

चेहरा पाहूनच राजकारणात घेतलं; शेट्टींची प्रतिस्पर्धी उर्मिलावर टीका

गोपाळ शेट्टी आणि उर्मिला मातोंडकर

लोकसभा २०१९ साठी मुंबई उत्तर मतदार संघातून एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणारे भाजपचे उमेदवार आणि खासदार गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, उर्मिलाजी यांना राजकारणात आणण्यात आले आहे. ते त्यांच्या चेहऱ्याकडे पाहूनच. यामध्ये कोणाला वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. त्या एका राजकीय कुटुंबातून आल्या आहेत. त्यांना राजकारणाची चांगली समज आहे. मात्र त्यांनी निवडलेला पक्ष हा खराब आहे.

काँग्रेसकडून उर्मिला यांना संधी 

यंदा लोकसभेत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेसतर्फे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना मुंबई उत्तर मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मराठमोळ्या उर्मिलाने पहिल्या दिवसापासून जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. या मतदार संघातून २०१४ साली मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांना भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात पराभव पत्कारावा लागला होता. मात्र २०१९ करता संजय निरुपम यांना गजानन किर्तीकर यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. २०१४ ला या जागेवरून काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत यांनी निवडणूक लढवली होती.

First Published on: April 11, 2019 2:01 PM
Exit mobile version