नेल पॉलिश रिमूवरने बोटाची शाई निघते; काँग्रेस प्रवक्त्याचा दावा

नेल पॉलिश रिमूवरने बोटाची शाई निघते; काँग्रेस प्रवक्त्याचा दावा

काँग्रेसचे प्रवक्ते संजय झा

लोकसभा निवडणुकीसाठी देशातील ९ राज्यामध्ये चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. अशामध्ये काँग्रेसचे प्रवक्ते संजय झा यांनी मोठा दावा केला आहे. मतदाना दरम्यान बोटाला लावलेली शाई नेल पॉलिशच्या रिमूवरने काढू शकतो असा दावा संजय झा यांनी केला आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे. आज दक्षिण मुंबई मतदार संघामध्ये मतदान केल्यानंतर संजय झा यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर टाकून हा दावा केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, बोटाला लावलेली शाई नेल पॉलिश रिमूवरने निघून जाते यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले पाहिजे. झा यांनी व्हिडिओमधअये आपले बोट दाखवले आहे त्यावर शाई दिसत नाही. त्यांनी असे म्हटले आहे की, माझ्या बोटाची शाई रिमूवरने काढून टाकली हे फक्त माझ्यासोबतच झाले नाही.

काय म्हणाले संजय झा

ट्विटरवर टाकलेल्या व्हिडिओमध्ये संजय झा यांनी असे म्हटले आहे की, ‘मतदान करुन आल्यानंतर मी माझ्या काही मित्रांकडून ऐकले की, बोटाला लावलेली शाई निघून जाते. मला आधी विश्वास बसला नाही. नंतर मी माझ्या बोटावर लावलेली शाई नेल पॉलिश रिमूवरने काढून टाकण्याचा प्रयत्न केला. तर रिमूवरने बोटाची शाई लगेच निघून गेली. तुम्ही पाहू शकता माझ्या बोटावर शाई नाही. मी प्रामाणिकपणे सांगत आहे की, शाईला लगेच काढता आले. निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे’

१० दिवस शाई बोटावरुन जात नाही

मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर मतदाराच्या हाताला शाई लावली जाते. ही शाई काही दिवस मतदाराच्या बोटाला तशीच राहते. ही शाई मैसूर पेंट्स और वार्निश लिमिटेड या कंपनीद्वारे पूरवली जाते. ही कंपनी भारतातील सर्व पालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकी दरम्यान शाईचा पुरवठा करते. त्याचप्रमाणे दोन डजन पेक्षा अधिक इतर देशामध्ये ही कंपनी शाईचा पुरवठा करते. ही शाई बोटाला लावल्यानंतर लगेच निघून जात नाही तर ती १० दिवसापर्यंत बोटाला तशीच राहते त्यानंतर ती फीकी पडू लागते. या शाईमध्ये सिल्वर नाइट्रेट मिसळलेले असते असे सांगितले जाते.

देवरा विरुध्द सावंत लढत

मुंबईमधील सहाही मतदार संघासाठी आज चौथ्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या मतदार संघात सकाळपासून मतदान सुरु आहे. मुंबई दक्षिण मतदार संघामध्ये काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा आणि शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्यामध्ये लढत होत आहेत.

First Published on: April 29, 2019 5:21 PM
Exit mobile version