नोटबंदीविरोधात काँग्रेसने साकारली रांगोळी

नोटबंदीविरोधात  काँग्रेसने साकारली रांगोळी

प्रातिनिधिक फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात ठाणे शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने नोटाबंदीची वर्षपूर्तीनिमित्त रांगोळी साकारून नोटबंदीदरम्यान बँकेच्या रांगेत उभे असताना मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहून या निर्णयाचा निषेध व्यक्त केला.

५२  नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशातील सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागला. शेतकरी, मजूर, व्यापारी अशा सर्वंच घटकांना या निर्णयाचा फटका बसला. तसेच बँकेच्या रांगेत जुन्या नोटा बदलण्यासाठी ५२  नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले, असा आरोप करत युवक काँग्रेसच्या वतीने नोटाबंदीची वर्षपूर्ती हा दिवस काळा दिवस मानून ठाणेसह राज्यभर आंदोलन करण्यात आले. ठाण्यात ठाणे शहर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष विनर बिंद्रा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटी कार्यालयाबाहेर ठाणे शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने बँकेच्या रांगेत जुन्या नोटा बदलण्यासाठी आपले प्राण गमवावे लागलेले ५२ भारतीय नागरिकांना रांगोळीद्वारे श्रद्धांजली अर्पण करून मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला.

मृतांना श्रद्धांजली

मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे नागरिकांना चांगलेच हाल सहन करावे लागले तसेच काही नागरिकांना आपले प्राण देखील गमवावे लागले त्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसने रांगोळी काढून मृतांना श्रद्धांजली अर्पण करत घटनेला जबाबदार असलेल्या सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केल्याचे अध्यक्ष विनर बिंद्रा यांनी यावेळी सांगितले. आगामी काळात देखील सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आंदोलने करण्यात येणार असल्याचे बिंद्रा यांनी यावेळी सांगितले.

First Published on: November 9, 2018 6:49 PM
Exit mobile version