काँग्रेस नेहमीच संभाजी राजेंच्या पाठीशी असेल – नाना पटोले

काँग्रेस नेहमीच संभाजी राजेंच्या पाठीशी असेल – नाना पटोले

संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी आज राज्यसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. पण, ते समाजकारणात सक्रीय राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Congress) नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेस नेहमीच संभाजी राजेंच्या पाठीशी असेल असे एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगीतले.

संभाजी राजे राज्यसभेत महाराष्ट्राची वेगळी शान –

संभाजी राजे (Sambhaji Raje) यांनी राज्यसभेत जायला हवे अशीच काँग्रेसची कायम भूमिका होती. त्यांच्यामुळे राज्यसभेत महाराष्ट्राची वेगळी शान होती. काँग्रेस (Congress) नेहमीच संभाजी राजेंच्या पाठीशी असेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले. यावेळी त्यांना शिवसेनेने राजेंना उमेदवारी द्यायला हवी होती असे वाटते का? असे विचारण्यात आले तेव्हा, मला माहिती नाही शिवसेनेसोबत त्यांचे काय झाले ते, असे ते म्हणाले.

कुणापुढे झुकून मला खासदारकी नको –

राज्यसभा निवडणूक लढवणार नाही, असे संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केले आहे. राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये, यासाठी मी हा निर्णय घेतला असल्याचे संभारीज राजे यांनी म्हटले आहे. मी राज्यसभा निवडणूक लढवत नसलो, तरी ही माघार नाही आहे, हा माझा स्वाभिमान आहे. कुणापुढे झुकून मला राज्यसभेची खासदारकी नको आहे, असे संभाजीराजे म्हणाले.

First Published on: May 27, 2022 3:45 PM
Exit mobile version