ठाणे महानगरपालिकेतर्फे संविधान दिन उत्साहात साजरा

ठाणे महानगरपालिकेतर्फे संविधान दिन उत्साहात साजरा

संविधान दिन उत्साहात साजरा

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या प्रास्ताविकेचे प्रकट वाचन करण्यात आले. महापालिकेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी तसेच शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत महापालिका भवन येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या डिजी ठाणेच्या माध्यमातून जवळपास २ लाख लोकांपर्यंत संविधानाची उद्देशिका पोहचवून भारतीय संविधानासंदर्भात जन-जागृती करण्यात आली.
यावेळी उप महापौर सौ. पल्लवी पवन कदम, अतिरिक्त आयुक्त (१) राजेंद्र अहिवर, अतिरिक्त आयुक्त (२) समीर उन्हाळे, उप आयुक्त ओमप्रकाश दिवटे, संदीप माळवी तसेच महापालिका कर्मचारी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संविधानाने नागरिकांना दिलेले अधिकार आणि हक्कांची जाणीव व्हावी, भारतीय संविधाना संदर्भात जनजागृती व्हावी, यासाठी २६ नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान महापालिका भवन येथे संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर ठाण्यातील कोर्ट नाका आणि स्टेशन रोड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

ठाणे महानगर पालिकेच्या डिजी ठाणे या डिजिटल प्रणालीद्यारे देखील जवळपास २ लाख लोकांपर्यंत संविधानाची उद्देशिका पोहचवून फेसबुक, व्हाट्सअँप तसेच ट्विटर य़ा सर्व डिजिटल माध्यमातून भारतीय संविधानासंदर्भात जन-जागृती करण्यात आली.


भारतीय संविधान : महान लोकशाहीचा आधारस्तंभ
First Published on: November 26, 2019 6:58 PM
Exit mobile version