भारतीय संविधान संविधानिक जीवन जगण्याचा मार्ग- डॉ. विष्णू मगरे

भारतीय संविधान संविधानिक जीवन जगण्याचा मार्ग- डॉ. विष्णू मगरे

मुंबई विद्यापीठाला नॅककडून अ++ श्रेणीचा दर्जा बहाल

भारतीय संविधान ही सजीव संहिता असून तिचे महात्म्य आणि स्थान देशाचे राज्यशकट चालवण्यासाठी चिरंजीव आहे. संविधान देशाला एकसंध ठेवणारी, देशवासीयांच्या शिक्षणापासून ते त्यांच्या भौतिक आणि आत्मिक उन्नयानाची प्रभावी उभारणी करणारी प्रेरक शक्ती आहे, असे प्रतिपादन एसएनडीटी महिला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांनी केले. मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सविंधान दिना निमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.

कल्याणकारी राज्याची जडण घडण कशी करावी व ते करत असताना कोणत्या धरबंधाचे भान ठेवावे याचे दिग्दर्शन करणारी राज्य घटना हा देशाचा अनंत काळाचा अनमोल ठेवा आहे. तिची प्रस्तूतता ही कालातीत असून देशापुढे येणार्‍या कुठल्याही समस्येचे आणि संकटाचे निवारण आणि निराकरण करण्याचे सामर्थ्य आपल्या राज्यघटनेत आहे. जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना म्हणून भारतीय राज्यघटनेकेडे पाहिले जाते. यासाठी द्रष्ट्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून अथक परिश्रम घेतले. समर्थ भारताच्या भविष्याचा वेध घेऊन, ते घडून आणण्यासाठी उपयुक्त तसेच अडथळा ठरू शकतील अशा सर्व बाबींचा विचार करून अनुरूप सवैधानिक तरतुदींचा घटनेत समावेश केला. नागरीकांचे मुलभूक हक्क आणि कर्तव्ये ते आदर्श राज्याच्या उभारणीसाठी करावयाची उपाययोजना, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांचा पुरस्कार ते सामाजिक आणि राजकीय न्याय आणि संधीची उपलब्धतता अशा विविध अंगी अधिष्ठान असणारी भारतीय राज्य घटना लोकशाहीवर निष्ठा असणार्‍या नागरिकासाठी जीवन जगण्याचा सवैधानिक मार्ग असल्याचेही त्यांनी नमूद केले. आभासी पद्धतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर हे होते. कार्यक्रमाला प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्यासह विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणातील सदस्य, प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

भारताचे संविधान हे राष्ट्र निर्मितीचा, देशाच्या संपन्नतेचा आणि समृद्धीचा राष्ट्रग्रंथ आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची व्यापकता यासह चौकस दृरदृष्टी दिसून येते. देशातील व्यक्ति केंद्रस्थानी मानून स्वातंत्र्य आणि समतेची आस धरणारा एक जिवंत दस्ताऐवज म्हणून भारतीय संविधानाकडे पाहिले जाते. भारतीय संविधानाला अभिप्रेत समाजरचना करून मार्गक्रमन करणे गरजेचे असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर म्हणाले. परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

First Published on: November 26, 2020 8:09 PM
Exit mobile version