उल्हासनगरचे सीएचएम कॉलेज बनतेय कोरोनाचे हॉटस्पॉट

उल्हासनगरचे सीएचएम कॉलेज बनतेय कोरोनाचे हॉटस्पॉट

कोरोना विषाणू

उल्हासनगरमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत चालला असून आता स्टेशनसमोरील सीएचएम महाविद्यालयाही कोरोनाने आपल्या लपेट्यात घेतले आहे. कोरोनामुळे महाविद्यालयाच्या रजिस्ट्रारचे निधन झाले असून त्यामुळे महाविद्यालयाचे कर्मचारी प्रचंड धास्तावले आहेत. कर्मचाऱ्यांमध्ये कोविडचा प्रसार होत असताना महाविद्यालयाने मात्र जबाबदारीपासून हात झटकल्याने कर्मचारी नाराजी व्यक्त करु लागले आहेत.

महाविद्यालयाचे रजिस्ट्रार रोचलांनी यांचे नुकतेच कोविडच्या संसर्गामुळे निधन झाले. त्याचप्रमाणे महाविद्यालयातील एक शिपाई, एक शिक्षक तसेच एका प्रयोगशाळा सहाय्याकालाही कोरोनाची लागण झाली आहे. कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लागण होऊ लागल्यापासून कर्मचारी हादरले आहेत. आधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर बोलावतांना त्यांना कोरोनाची लागण झाल्यास आपण स्वतः सर्व जबादारी घेऊ असे सांगितले होते. तसेच त्यांना महाविद्यालयाच्यावतीने राहण्याची व्यवस्था करुन देऊ, असा शब्दही दिला होता. आता मात्र कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मात्र कोविड असलेल्या कर्मचाऱ्यांना कॉलेजमधून बाहेर काढले जात असल्याने कर्मचारी संतापले आहेत. आमची जबाबदारी घ्यायची नव्हती तर आम्हाला कालेजमध्ये बोलावले कशाला असा प्रश्न कर्मचारी विचारु लागले आहेत.

महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी याबाबत त्यांची बाजू जाणून घेण्याचा सतत प्रयत्न करुनही त्यांच्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

हेही वाचा –

‘डॉ. बाबासाहेबांचे कार्य, विचारांवरील श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही’

First Published on: July 8, 2020 10:39 AM
Exit mobile version