कोरोना रोखण्यासाठी पालिकेचा नवा अ‍ॅक्शन प्लॅन; कोविड सेंटर्ससाठी पंचतारांकित हॉटेल्स ताब्यात घेणार

कोरोना रोखण्यासाठी पालिकेचा नवा अ‍ॅक्शन प्लॅन; कोविड सेंटर्ससाठी पंचतारांकित हॉटेल्स ताब्यात घेणार

राज्यातील दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईत देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मुंबई कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली आहे. राज्यात कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. पालिकेने नवा अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. पालिका पुन्हा एकदा कोविड सेटर्समध्ये वाढ करणार आहे. यासाठी पंचतारांकित हॉटेल्स पालिका ताब्यात घेणार आहे, असं पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी सांगितलं.

मुंबई महापालिका मुंबईतील पंचतारांकीत हॉटेल्स ताब्यात घेऊन त्यांचं कोविड सेंटर्समध्ये रुपांतर करणार आहे. याठिकाणी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना ठेवण्यासाठी केला जाईल. तसेच या सगळ्या कामांवर देरखेख ठेवण्यासाठी मुंबईच्या २४ वॉर्डांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे नोडल अधिकारी दुपारी ३ ते रात्री ११ आणि रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेत काम पाहतील. वॉर रूमचे नोडल अधिकारी आणि जम्बो कोविड सेंटरचे अधिकारी एकामेकांच्या सतत संपर्कात असतील.

 

First Published on: April 12, 2021 10:49 AM
Exit mobile version