कल्याण डोंबिवलीत ३० नवे कोरोना रुग्ण; संख्या ५३० वर!

कल्याण डोंबिवलीत ३० नवे कोरोना रुग्ण; संख्या ५३० वर!

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज दिवसभरात नवीन ३० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून, आजच्या या ३० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या ५३० झाली आहे. यापैकी आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून १९६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ३२३ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज आढळलेल्या या ३० रूग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील ८, कल्याण पश्चिमेतील ६, डोंबिवली पूर्वेतील ३, डोंबिवली पश्चिमेतील १२ आणि आंबिवली येथील १ रुग्णाचा समावेश आहे.

आज आढळलेले हे ३० रुग्ण कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी, विजय नगर, कोळसेवाडी, चक्की नाका, नांदीवली, गणेशवाडी, कल्याण पश्चिमेतील आदर्श कॉलनी, आधारवाडी, आधारवाडी जेल रोड, संतोषी माता मंदिर रोड, डोंबिवली पूर्वेतील तुकाराम नगर आणि एम.आय.डी.सी परिसर, डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाण पाडा, शास्त्रीनगर, कोपरगाव, कोपर रोड, सुभाषरोड, ठाकूरवाडी, आनंदनगर आणि आंबिवली या परिसरात राहणारे आहेत.

ठाणे जिल्ह्यात २४४ नवीन रुग्णांची नोंद

ठाणे जिल्ह्यात सोमवारी नवीन २४४ नवीन रुग्णांची भर पडली तर सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या ३९२८ वर पोहोचली. तर मृतांचा आकडा ११९ झाला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात आज ९१ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२६९ झाली आहे. नवी मुंबईत ७४ नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे संख्या १२६४ झाली. मीरा भाईंदर मध्ये २९ रुग्ण आढळल्याने रुग्ण संख्या ३५९ वर पोहोचली आहे. उल्हासनगर मध्ये नवीन ७ रुग्णांची नोंद झाली असून रुग्णसंख्या १२६, भिवंडीत एक नवीन रुग्ण आढळला असून रुग्णसंख्या ४३, अंबरनाथमध्ये २ नवीन रुग्ण नोंद झाली असून रुग्ण संख्या ३६, बदलापूरमध्ये २ नवीन रुग्ण सापडले असून रुग्णसंख्या ११६ तर ठाणे ग्रामीण परिसरात ८ नवीन रुग्ण सापडल्याने रुग्ण संख्या १८५ वर पोहोचली आहे.

First Published on: May 18, 2020 11:38 PM
Exit mobile version