कोरोना रुग्णाच्या मृतदेहाला दफन करण्याची परवानगी – मुंबई हायकोर्ट

कोरोना रुग्णाच्या मृतदेहाला दफन करण्याची परवानगी – मुंबई हायकोर्ट

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दफन करण्यास मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली आहे. कोविड – १९ रुग्णाचा मृतदेह दफन करु नये याबाबत अनेक याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाल्या होत्या. यावर कोर्टाने मृतदेह दफन करण्यास परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याचा मृतदेह दफन करू नये याबाबत मुंबई हायकोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिका कोर्टाने फेटाळल्या असून यावर निकाल देताना कोर्टाने कोविड – १९ रुग्णाचा मृतदेह दफन करण्यास परवानगी दिली आहे. तसेच याबाबत मुंबई महानगरपालिकेने नव्याने आदेश काढावे, असे आदेशही त्यांनी दिले. दरम्यान, मृतदेह दफन करताना नातेवाईकांची पूर्ण काळजी घेण्यात यावी, असेही हायकोर्टाने या आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा – पालघर लिंचिंग प्रकरण भोवलं, अखेर ‘त्या’ पोलीस अधिक्षकांची बदली!

मुंबई पालिकेने काढले होते आदेश 

आपल्या देशात विविध धर्माचे लोक राहतात. काही धर्मांमध्ये मृतदेह दहन केले जाते तर काहींमध्ये दफन केले जाते. अशा परिस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मृतदेहामार्फत संसर्ग होऊ नये, म्हणून मुंबई महानगरपालिकेने मृतदेह दफन न करण्याचे परिपत्रक ३० मार्च रोजी काढले होते. मात्र त्यानंतर त्याच दिवशी ज्या दफनभूमीत मोठी जागा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मृतदेह दफन करु शकता, अशा आशयाचा दुसरा सुधारित आदेश पालिकेने काढला. या दोन्ही आदेशाविरोधात कोर्टात याचिका करण्यात आली होती. दुसऱ्या सुधारित आदेशाविरोधात वांद्रे परिसरातील राहणारे प्रदीप गांधी यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यात त्यांनी वांद्रे येथील मुस्लिम कब्रस्तानमध्ये दफनविधी करू नये, अशी मागणी केली होती.

First Published on: May 23, 2020 5:11 PM
Exit mobile version