CoronaVirus: आता शिवसेनेचे आमदार-खासदारही देणार एका महिन्याचे वेतन!

CoronaVirus: आता शिवसेनेचे आमदार-खासदारही देणार एका महिन्याचे वेतन!

शिवसेना

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. वैद्यकीय आघाडीवरही युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, या संकटामुळे आर्थिक समस्या उद्भवण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या संकटप्रसंगी राज्य शासनासोबत काम करण्यासाठी शिवेसनेचे विधानसभा आणि विधान परिषदेचे सर्व आमदार, तसेच लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व खासदार आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द करणार आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली.

करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सुनियोजित पद्धतीने उपाययोजना करत आहे. ‘तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो’, अशी भूमिका घेत मुख्यमंत्री राज्यातील जनतेला सर्वोतोपरी सहाय्य करण्याचं आश्वासन देत आहेत. या लढाईत आपला देखील खारीचा वाटा असावा म्हणून शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार आहेत.

राज्यातील शेतकरी, कामगार, मजूर आणि गोरगरीब जनतेला या निधीचा निश्चित फायदा होईल, असा आशावाद देसाई यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडे संबंधितांनी धनादेश जमा करावेत, असे आवाहन देसाई यांनी केले आहे.


खासगी डॉक्टर्सनी दवाखाने बंद न ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
First Published on: March 27, 2020 7:57 AM
Exit mobile version