मुंबईतील Corona आकडेवारी पूर्णपणे पारदर्शक, पालिकेचे फडणवीसांच्या दाव्यावर स्पष्टीकरण

मुंबईतील Corona आकडेवारी पूर्णपणे पारदर्शक, पालिकेचे फडणवीसांच्या दाव्यावर स्पष्टीकरण

कोरोनाच्या संभाव्‍य तिसऱया लाटेचा सामना करण्‍यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज

मुंबईची स्थिती सध्या रिकव्हरीकडे वाटचाल करत आहे. मात्र मुंबईतील कोरोनाची नेमकी मृत्यूसंख्या उघड केली जात नाही त्याचप्रमाणे कोरोना चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करत कोरोना संसर्गाचा दर कमी होत असल्याचे आभासी चित्र मुंबई महापालिकेकडून उभे केले जात असल्याचा दावा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मात्र आता मुंबई महानगरपालिकेने फडणवीसांच्या दाव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. जागतिक आरोग्य संघटना,भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था यांनी ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणेच बृहन्मुंबई महानगरपालिका कोरोना चाचण्या व कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या नोंदी करत आहे. कोरोना व्यवस्थापनामध्ये संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेले अविरत प्रयत्न प्रत्यक्ष दिसत असलेल्या मुंबईच्या आकडेवारीत उमटत आहेत. मुंबईतील कोरोना संसर्गाचे व्यवस्थापन आणि आकडेवारी ही पूर्णपणे पारदर्शक आहेत,असे स्पष्टिकरण मुंबई महापालिकेने दिले आहे.


कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी लपवली जात नाही किंवा त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची छेडधाड केली जात नाही. दररोज आरोग्य वार्तांमधून येणाऱ्या मृत्यूंच्या आकड्यांचीच नोंद करण्यात येते, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या संबंधित सर्व वेबसाईटवर रोजच्या आकडेवारीची नोंद करण्यात येते. त्याचप्रमाणे सरकारकडेही नियमितपणे सर्व माहिती सादर करण्यात येते त्यामुळे आकडे स्पष्ट सांगितले जात नसल्याचा आरोप बिनबुडाचा ठरतो असे पालिकेने म्हटले आहे.

त्याचप्रमाणे कोरोना संसर्गाने झालेल्या मृत्यूचा दर लपवण्याचा कोणताही प्रयत्न महापालिका प्रशासनाने केलेला नाही. तसेच भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद( ICMR), केंद्र सरकारने निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे मुंबईत कोरोना चाचण्या केल्या जातात. मुंबईतील कोरोना व्यवस्थापन पूर्णपणे पारदर्शक आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आता हळूहळू कमी होत आहे. त्याचप्रमाणे कंटेनमेंट झोनमधील उपाययोजनेची काटेकोर अंमलबजावणी तसेच ब्रेक द चेनच्या अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधांचा साकारात्मक परिणाम मुंबईवर दिसत असल्याचे पालिकेने नमूद केले आहे.


हेही वाचा – Mumbai Corona Update: सलग दुसऱ्या दिवशी मुंबईच्या रुग्णसंख्येत घट, ३ हजारांहून अधिक कोरोनामुक्त

First Published on: May 9, 2021 8:27 PM
Exit mobile version