महाराष्ट्रात तिसरी लाट अटळ, तज्ज्ञांचा इशारा

देशासह महाराष्ट्रात दुसरी लाट नियंत्रण येत असतानाच अचानक कोरोनारुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आले आहे. जुलै महिन्याच्या पहील्या अकरा दिवसांमध्येच एकट्या महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा ८८ हजार १३० वर पोहचला आहे. या आकडेवारीवरून महाराष्ट्रात तिसरी लाट अटळ असून ही त्याची सुरूवात असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

देशात मार्चपासून कोरोनारुग्णसंख्या वाढू लागल्याने तज्ज्ञांनी दुसऱ्या लाटेचा इशारा दिला होता. एप्रिल व मे महिन्यात विविध राज्यांमध्ये रुग्णसंख्येचा स्फोट झाला. त्यावेळी केरळ व महाराष्ट्रासह दिल्लीत सर्वाधिक कोरोनाबधित होते. जूनमध्ये दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याचे दिलासादायक दृश्य होते. पण जुलैच्या पहील्याच अकरा दिवसांमध्ये राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ८८ हजार १३० वर पोहचला आहे. ही चिंतेची बाब असून महाराष्ट्रात तिसरी लाट येण्याचे हे संकेत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तसेच जुलै महिन्याच्या पहील्या अकरा दिवसांची कोरोनारु्ग्णांची आकडेवारी पाहता महाराष्ट्रापेक्षा केरळमध्ये कोरोनारुग्णसंख्या अधिक वेगाने वाढत असल्याचे समोर आले आहे. गेल्या ११ दिवसांमध्ये केरळमध्ये १ लाख २८ हजार ९५१ वर पोहचली आहे.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांची आकडेवारीही धक्कादायक आहे. दिवसेंदिवस कोरोनारुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे यात दिसून आले आहे. कोल्हापूरमध्ये गेल्या ११ दिवसात ३००० हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पण मुंबईत मात्र दिलासादायक चित्र आहे. येथील रुग्णसंख्या ६०० च्याही खाली आहे.

पण कोल्हापूरबद्दल बोलताना कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉक्टर शशांक जोशी यांनी सांगितले की कोल्हापूरमध्ये लसीकरण जरी सर्वाधिक असले तरी पॉझिटीव्हिटी रेटही वाढत आहे. सध्या डेल्टा व्हेरिएंटचा धोका आहे. पण असे असले तरी नागरिकांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नाहीये. यामुळेच विषाणूचा प्रसार वेगाने होतोय.

First Published on: July 13, 2021 2:09 PM
Exit mobile version