रामदास आठवले यांच्या ताफ्यातील पोलीसाला कोरोनाची लागण!

रामदास आठवले यांच्या ताफ्यातील पोलीसाला कोरोनाची लागण!

सध्या कोरोनाने थैमान घातले असून, राज्यात दिवसेंदिवस हा आकडा वाढत असताना आता केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या ताफ्यातील पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रामदास आठवले यांच्या मुंबईच्या वांद्रे येथील ‘संविधान’ या निवासस्थानी सुरक्षेसाठी हा पोलीस कर्मचारी तैनात होता. हा कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून गावी गेला होता. या पोलीस कर्मचाऱ्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असून, त्याच्यावर नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान राज्यात एकूण ६४ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

या पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्याचा शोध सुरू 

दरम्यान रामदास आठवले यांच्या ताफ्यात असलेल्या पोलिसाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध सुरू असून, रामदास आठवले यांच्या निवासस्थानी कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बिघडली होती. ते काही दिवसांपूर्वी गावाला गेले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले. यावेळी त्यांची रक्त तपासणी करण्यात आली होती. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदार आठवले यांच्याअगोदर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकारी निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मंगळवारी समोर आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या
मातोश्री’ या निवासस्थाना शेजारी काही दिवसापूर्वी एक चहावाला कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.
First Published on: April 22, 2020 10:28 PM
Exit mobile version