Corona Update : सीरम इन्स्टिट्यूटकडून कोव्हिशिल्डचे उत्पादन पुन्हा सुरू; ‘इतक्या’ डोसचे टार्गेट

Corona Update : सीरम इन्स्टिट्यूटकडून कोव्हिशिल्डचे उत्पादन पुन्हा सुरू; ‘इतक्या’ डोसचे टार्गेट

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मागील वर्षी करोनाच्या रुग्णांमध्ये कमालीची घट झाल्यामुळे कोव्हिशिल्ड लशींचे (Covishield vaccines) उत्पादनही थांबवण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. यापार्श्वभूमीवर आता लसींचे उत्पादन पुन्हा सुरु करण्यात आले आहे.

देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना कोव्हिशिल्ड लसींचा तुडवडा होऊ लागला आहे. यापार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानेसुद्धा कोव्हिशिल्ड लसींचे उत्पादन पुन्हा सुरु केले आहे. त्यामुळे पुढील ९० दिवसांत ६ ते ७ मिलियन अर्थात ७० लाख कोविशिल्ड लशीचे डोस तयार करण्याचे टार्गेट आहे. अशी माहिती सिरमचे सीईओ अदर पुनावाला (Another Punawala) यांनी दिली आहे. त्यांनी बुधवारी (12 एप्रिल) सांगितले की, विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर कोविड-19 लस कोविशील्डचे उत्पादन पुन्हा सुरू केले आहे. ते म्हणाले की कोवॅक्स लसीचे 60 लाख बूस्टर डोस कंपनीकडे आधीच उपलब्ध आहेत आणि प्रौढांनी हे बूस्टर डोस जरूर घ्यावे. COVID-19 लसींचा तुटवडा असल्याच्या वृत्ताला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, लस उत्पादक तयार आहेत पण मागणी नाही.

First Published on: April 13, 2023 12:36 PM
Exit mobile version