Corona Vaccination : मुंबईत रविवारीही लसीकरण केंद्र सुरू राहणार, पाहा लसीकरण केंद्रांची यादी

Corona Vaccination : मुंबईत रविवारीही लसीकरण केंद्र सुरू राहणार, पाहा लसीकरण केंद्रांची यादी

रविवारीही कोविड लसीकरण केंद्र राहणार सुरू

मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड-१९ लसीकरण मोहिमेतंर्गत महानगरपालिका, शासन यांच्यातर्फे ५९ कोरोना लसीकरण केंद्रे, तसेच खाजगी रुग्णालयात ७३ कोरोना लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहे. कोविड प्रतिबंध लसीचा साठा मर्यादित स्वरुपात असल्या कारणामुळे ३० सार्वजनिक तर ७ खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात उद्या (२५ एप्रिल) पहिल्या सत्रात अथवा सदर लसीकरण केंद्रात लससाठा उपलब्ध असेपर्यंत लसीकरण करण्यात येईल. या लसीकरण केंद्रांवर दुसऱ्या डोसचे लाभार्थी आणि प्रथम येणाऱ्या लाभार्थीस प्राधान्य देण्यात येणार आहे.

सार्वजनिक रुग्णालयांची यादी –

ई : जे. जे. रूग्णालय, भायखळा
ई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रूग्णालय, भायखळा
ई: कस्तुरबा रूग्णालय, चिंचपोकळी
एफ/दक्षिण : केईएम रूग्णालय, परळ
एफ/दक्षिण : टाटा मेमोरियल रुग्णालय, परळ
एफ/उत्तर : मुंबई पोर्ट ट्रस्ट, वडाळा
एफ/उत्तर : अकवर्थ रुग्णालय, वडाळा
जी/दक्षिण : वरळी कोळीवाडा आरोग्य केंद्र, वरळी
जी/ दक्षिण : ईएसआयएस रुग्णालय, वरळी
एच/पूर्व : व्ही.एन.देसाई रूग्णालय, सांताक्रूझ
एच/पश्चिम: भाभा रूग्णालय, वांद्रे
के/पूर्व : शिरोडकर प्रसुतीगृह, विलेपार्ले
के/पूर्व : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालय, जोगेश्वरी
के/ पश्चिम : कुपर रूग्णालय, जुहूपी/ दक्षिण: टोपीवाला दवाखाना,गोरेगाव
पी/ दक्षिण : गोकूळधाम प्रसृतिगृह, गोरेगाव
पी/ दक्षिण : मीनाताई ठाकरे रक्तपेढी कोविड लसीकरण केंद्र, गोरेगाव
पी/ उत्तर : स.का. पाटील रूग्णालय, मालाड
पी/उत्तर : मालवणी सरकारी रूग्णालय, मालाड
पी/उत्तर : चौकसी प्रसुतिगृह, मालाड
पी/उत्तर : आप्पापाडा प्रसुतिगृह, मालाड
आर/ दक्षिण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय, कांदिवली
आर/ दक्षिण : चारकोप विभाग १ दवाखाना, कांदिवली
आर/ दक्षिण : आकुर्ली प्रसूतिगृह, कांदिवली
आर/ दक्षिण : इएसआयएस रूग्णालय, कांदिवली
आर/ मध्य : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रूग्णालय, बोरिवली
एम/ पूर्व : शताब्दी रूग्णालय, गोवंडी
एम/ पश्चिम : माँ रूग्णालय, चेंबुर
एस : लालबहादूर शास्त्री प्रसुतिगृह, भांडूप
एस : क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले जनरल रुग्णालय, विक्रोळी

खासगी रूग्णालयातील कोविड लसीकरण केंद्र –

सी : मित्तल रुग्णालय, चर्नी रोड
के/पूर्व : क्रिटीकेअर रुग्णालय, अंधेरी
पी/उत्तर : तुंगा रुग्णालय, मालाड
पी/उत्तर : लाईफ लाईन मल्टीस्पेशलिस्ट रुग्णालय, मालाड
आर/दक्षिण : शिवम रूग्णालय, कांदिवली
एल विभाग : कोहिनूर रुग्णालय, कुर्ला
एम/पश्चिम : ईनलॅक्स् रुग्णालय, चेंबूर

First Published on: April 24, 2021 11:27 PM
Exit mobile version