Corona Vaccination: मुंबईतील ‘या’ प्रमुख स्थानकावर होणार प्रवाशांची कोरोना टेस्ट

Corona Vaccination: मुंबईतील ‘या’ प्रमुख स्थानकावर होणार प्रवाशांची कोरोना टेस्ट

Corona Vaccination: मुंबईतील 'या' प्रमुख स्थानकावर होणार प्रवाशांची कोरोना टेस्ट

मुंबईतील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मिशन टेस्टिंग योजना राबवली जाणार आहे. यामध्ये मुंबईत दिवसाला ५० हजार टेस्ट पूर्ण करण्याची तयारी मुंबई महानगरपालिकेने केली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढवल्यामुळे मुंबईतील मॉल, थिएटर, रेल्वे स्थानक, बस स्थानकांत येणाऱ्या प्रवाशांची अँटीजन चाचण्या केल्या जाणार आहेत. मिशन टेंस्टिंगअंतर्गत ही अँटीजन केली जाणार आहे.

मुंबईतील २५ मोठ्या मॉलमधील ग्राहकांची अँटीजन टेस्ट केली जाणार आहे. याबरोबरच मुंबईतील ७ प्रमुख स्थानकांवर बाहेर गावहून येणाऱ्या नागरिकांचीही आता अँटीजन टेस्ट केली जाणार आहे. यात वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल, सीएसएमटी, कुर्ला, अंधेरी, बोरिवली या स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांवर दिवसाला किमान १००० प्रवाशांची टेस्ट होणार आहे. विदर्भात कोरोना रुग्ण अधिक सापडत असल्याने विदर्भातून येणाऱया प्रवाशांवर मुंबई पालिका प्रशासन विशेष लक्ष ठेवून आहे.

याचबरोबर मुंबईतील प्रमुख परळ, दादरसारख्या बस स्थानकावरही प्रवाशांची चाचणी होणार आहे. बसस्थानकावरही दिवसाला दररोज १ हजार चाचण्या करण्याचे लक्ष पालिकेने ठेवले आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्याने आता मुंबईतील ४३ नव्या खाजगी रुग्णालयांमध्येही लसीकरण मोहिम सुरु केली जाणार आहे. सध्या मुंबईत दिवसाला ४५ हजार नागरिकांचे लसीकरण होते.


 

First Published on: March 19, 2021 11:54 AM
Exit mobile version