corona vaccination : तृतीयपंथीयांच्या आरोग्यासाठी महापालिका सरसावली, आरोग्य शिबीर घेणार

corona vaccination : तृतीयपंथीयांच्या आरोग्यासाठी महापालिका सरसावली, आरोग्य शिबीर घेणार

corona vaccination : तृतीयपंथीयांच्या आरोग्यासाठी महापालिका सरसावली, आरोग्य शिबीर घेणार

तृतीयपंथीयांच्या आरोग्यासाठी आता मुंबई महापालिका सरसावली आहे. पालिकेने तृतीयपंथी समाजातील लोकांमधील उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा आणि इतर आरोग्याशी संबंधित समस्यांचे प्रमाण जाणून घेण्यासाठी अनेक भागांत एक दिवसीय आरोग्य कार्यशाळा आणि शिबिराचे आयोजन केले आहे. पालिकेने पुढील आठवड्यात २४ नोव्हेंबर रोजी या शिबिराचे आयोजन केले आहे.

या शिबिरादरम्यान पालिका एनसीडी तपासणीसाठी या नागरिकांचे रक्ताचे नमुने घेणार आहे. तसेच या आजारांबद्दल जनजागृती देखील केली जाईल. पालिका अधिकाऱ्याने सांगितले की, तृतीयपंथी नागरिकांमध्ये आरोग्याशी संबंधित जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे, कारण अनेक तृतीयपंथी इम्युनोकॉम्प्रोमाइज्ड असल्याने त्यांना संसर्गाचा धोका जास्त आहे.

पालिकेच्या विभागातील वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, पालिका असंसर्गजन्य आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेत आहेत, ज्यासाठी अनेक आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. कारण मृत्यू आणि अपंगत्वासाठी मोठ्याप्रमाणात हे असंसर्गजन्य आजार जबाबदार असतात.

“कोरोना साथीच्या काळात मुंबईकरांच्या आरोग्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. ज्यामुळे नागरिकांनी प्राधान्याने तपासणी करणे आवश्यक आहे. शिवाय तृतीयपंथी नागरिकांनाही अनेक असंसर्गजन्य आजारांनी ग्रस्त आहेत ज्यांची त्यांना माहितीच नाही. त्यामुळे या शिबिरांच्या माध्यमातून आम्हाला कळेल की, तृतीयपंथींपैकी किती जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आरोग्य समस्या आहेत,” असंही ते म्हणाले.

दरम्यान, मुंबईतील संपूर्ण लोकसंख्येला तंदुरुस्त, निरोगी ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आखलेल्या योजनांचे आरोग्य तज्ज्ञांकडूनही कौतुक करण्यात आले. अनेक वेळा लोकांकडून NCD या आजारांकडे दुर्लक्ष केले जाते मात्र भविष्यात त्याचे गंभीर परिणाम सहन करावे लागतात. “कोरोना साथीच्या काळात कोरोनामुळे मरण पावलेल्यांपैकी बहुतेकांना इतर गंभीर आजार होते ज्यामुळे त्यांची केस गंभीर बनली होती. पण जर प्रत्येकाला या आजारांबद्दल आधीच माहिती असेल, तर त्या लोकांवर तात्काळ उपचार होऊ शकतात,” अशी माहिती मुंबई पालिकेच्या एका डॉक्टरने सांगितली.

अलीकडे, पालिकेने ट्रान्सजेंडर आणि एलजीबीटी समुदायासाठी विशेष लसीकरण मोहीम देखील आयोजित केली होती ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला.


 

First Published on: November 20, 2021 9:09 AM
Exit mobile version