Corona Vaccianation : मुंबईत १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणात पहिला मान दिव्यांग महिलेला

Corona Vaccianation : मुंबईत १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणात पहिला मान दिव्यांग महिलेला

Corona Vaccianation : मुंबईत १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणात पहिला मान दिव्यांग महिलेला

राज्यात १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज १ मे महाराष्ट्र दिनानिमित्ताने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व खासदार अरविंद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे येथील जम्बो कोविड लसीकरण केंद्रावर प्रातिनिधिक स्वरूपात पार पडला. या लसीकरण मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे अल्नाज चालराणी या ३२ वर्षीय दिव्यांग महिलेला लसीचा पहिला डोस देण्यात आला. यानिमित्ताने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी, १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांनी लसीकरणापूर्वी ज्यांना – ज्यांना शक्य असेल त्यांनी रक्तदान करावे. जेणेकरून रक्ताचा पुढील सहा महिन्यांमध्ये तुटवडा जाणवणार नाही, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी यानिमित्ताने केले आहे.

महापौर किशोरी पेडणेकर व खासदार अरविंद सावंत यांनी नायर रुग्णालयातील लसीकरण केंद्र आणि मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयातील लसीकरण केंद्राला भेट देऊन लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी, आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल, नगरसेवक कप्तान मलिक, वांद्रे येथील जम्बो कोविड लसीकरण केंद्राचे प्रमुख डॉ. राजेश डेरे, सेव्हन हिल्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अडसूळ उपस्थित होते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राला १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांकरिता तीन लाख डोस उपलब्ध झाले असून त्यापैकी २० हजार डोस हे मुंबई महापालिकेला उपलब्ध झाले असल्याचे महापौरांनी सांगितले. १ मे पासून महापालिकेच्या ५ लसीकरण केंद्रांवर केवळ १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. हे लसीकरण केवळ ‘कोविन ॲप’ मध्ये नोंदणी केलेल्या तसेच लघुसंदेश प्राप्त झालेल्या व्यक्तींसाठी असणार आहे. तसेच सध्यातरी लशीची केवळ पहिली मात्रा घेणाऱ्यांनाच या सुविधेचा लाभ दिला जाणार आहे.

लशींच्या मात्रांचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या – त्याप्रमाणे तीन पाळ्यांमध्ये लसीकरण करण्यास आम्ही तयार असल्याचे महापौरांनी सांगितले. खासदार अरविंद सावंत यांनी, १८ ते ४४ वयोगटातील पाच कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र राज्य लसीकरणामध्ये संपूर्ण देशात एक नंबर वर असून या लसीकरण मोहिमेला सुद्धा मुंबईकर नागरिकांनी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

महापालिकेच्या ५ रुग्णालयांमध्ये लसीकरण

१. बा. य. ल.‌ नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर).

२. सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर)

३. डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर).

४. सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर).

५. वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर.

First Published on: May 1, 2021 10:20 PM
Exit mobile version