होम क्वारंटाईन असल्याने चिंतेत आहात? या नंबरवर कॉल करा चिंता, दूर करा

होम क्वारंटाईन असल्याने चिंतेत आहात? या नंबरवर कॉल करा चिंता, दूर करा

विविध शुल्कात दरवर्षी ५% दरवाढ करण्याचा प्रस्ताव दप्तरी दाखल

मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने मुंबईतील होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. महापालिकेचं आरोग्य विभाग प्रोजेक्ट मुंबई आणि स्टेप वन संस्थेसोबत मिळून होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांना मानसिक आधार देत आहेत. होम क्वारंटाईन असल्यामुळे निराश झालेल्या, एकटेपणा जाणवणाऱ्या रुग्णांसाठी मदत क्रमांक तयार करण्यात आला आहे. रुग्णाला तणावयुक्त, उदास, एकटे, चिंता, काळजी वाटत असेल तर अशा रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी १८००-१०२-४०४० हा मदत क्रमांक देण्यात आला आहे.

या क्रमांकावर फोन केल्यानंतर कोरोनाबाबब घ्यावयाची काळजी तसंच मानसित ताण दूर करण्यासाठी समुपदेशन करण्यात येतं. स्टेप वन एजन्सी पालिकेला IVR कॉल करुन रुग्णांना माहिती देण्याबद्दल मदत करते. होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांची यादी पालिकेने त्या एजन्सिकडे दिली आहे. त्यानंतर रुग्णांना IVR कॉल जातो. त्यानंतर त्यांना सल्ला दिला जातो. होम क्वारंटाईनच्या गाईडलाईन्स सांगितल्या जातात. रुग्णांचा पाठपुरावा करण्यासाठी कॉल केला जातो.

‘प्रोजेक्ट मुंबई’द्वारे मानसिक जागरूकता केली जाते. जर रुग्णांना मानसिक ताण असेल किंवा निराशा आली असेल तर या हेल्पलाईनवरुन सल्ला दिला जातो. रुग्णांचं समुपदेशन केलं जातं. जर रुग्णांना डॉक्टरांची गरज लागली तर त्यांचा कॉल डॉक्टरांशी कनेक्ट करुन दिला जातो.

पालिकेचा आरोग्य विभाग प्रोजेक्ट मुंबई आणि स्टेप वन संस्थेसोबत मिळून होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांना मानसिक आधार देत आहोत. स्टेप वन एजन्सी पालिकेला IVR कॉल करुन रुग्णांना माहिती देण्याबद्दल मदत करते. तर ‘प्रोजेक्ट मुंबई’द्वारे मानसिक जागरूकता केली जाते. जर रुग्णांना मानसिक ताण असेल किंवा निराशा आली असेल तर या हेल्पलाईनवरुन सल्ला दिला जातो. ही मोहिम बऱ्या दिवसांपासून सुरु आहे. आता रुग्ण वाढल्याने आम्ही मनुष्य बळ वाढवलं आहे.

 

डॉ. मंगला गोमारे
कार्यकारी अधिकारी, मुंबई महानगरपालिका

 

First Published on: April 19, 2021 6:35 PM
Exit mobile version