LockdownEffect – कोरोनामुळे बेस्टला १०० कोटींचा फटका!

LockdownEffect – कोरोनामुळे बेस्टला १००  कोटींचा फटका!

कोट्यावधी रुपयांच्या तोट्यात असलेल्या बेस्टला कोरोनाचा विळख्यात अडकली आहे. कोरोनामुळे दररोज बेस्टला दीड कोटी रुपयाचे महसुलाचे नुकसान होत आहे. ३ मेपर्यत बेस्टला सरासरी १०० कोटी रुपयाचे नुकसान सोसावे लागणार आहे. अशी माहिती बेस्टचा सूत्राने दैनिक आपलं महानगरला दिली आहे. त्यामुळे बेस्टला आर्थिक संकटातून काढायचे कसे असा मोठा प्रश्न बेस्ट प्रशासनाला पडला आहेत.

कोरोना विषाणूमुळे सर्वत्र बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर आणि उद्योगांवर होत आहे. २४ मार्च ते १४ एप्रिलपर्यत अशा २१ दिवसांच लॉकडाऊन लागू होता. मात्र कोरोना विषाणूवर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी मंगळवारी,  सकाळी १० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ दिवस म्हणजे ३ मेपर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. आगोदरच या २४ मार्चपासून या लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. तर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कामगारांसाठी मुंबई आणि उपनगरात बेस्ट बस गाड्या सुरू आहे. मात्र ४० दिवसाचा लॉक डाऊन काळात बेस्ट उपक्रमाच्या वाहतूक विभागला दररोज प्रवासी महसुलातून दीड कोटीचा आर्थिक फटका बसतो आहे. त्यामुळे  ६० कोटी रुपये नुकसान होत आहेत. तर प्रत्येक दिवशी कर्मचाऱ्यांना वेतनावर ५० लाख रुपये खर्च होतो आहे. आगोदर बेस्ट उपक्रमाकडे तब्बल २ हजार ५०० कोटींचा तोट्यात आहेत. आणखी कोरोनामुळे बेस्ट तोट्याच्या खाईत गेल्याने बेस्टला वाचवायचे कसे असा मोठा प्रश्न बेस्ट उपक्रमाला पडला आहे.

असा होतो तोटा

कोरोना पूर्वी बेस्टच्या परिवहन विभागात दररोज प्रवासी वाहतुकीतून १ कोटी ७० लाख रुपयांच्या महसूल मिळत होता. मात्र कोरोनामुळे प्रवाशांसाठी बेस्टचे चाक थांबले. फक्त अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बेस्टच्या बसेस काही प्रमाणात धावत आहेत. त्यामुळे आता फक्त बेस्टला दररोज १५ ते २० लाख रुपयांचा मसूल मिळत आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी बेस्टला प्रवासी वाहतुकीतून मिळणारे दीड कोटीचे नुकसान होत आहे.  तसेच प्रत्येक महिन्याला बेस्टला कर्मचारी वेतनावर दररोज ५० लाख रुपये खर्च येतो. तसेच डिझेल आणि इतर खर्च मिळून लॉकडाऊन काळात सरासरी १०० कोटीचे फटका बेस्टला बसणार आहेत.

आठ कोटी रुपयांचा फटका 

लॉक डाऊन कालावधीसाठी दैनंदिन सेवा देणाऱ्या बेस्ट कामगारांना ३०० रुपये भत्ता जाहीर केला आहे. साधारण बेस्टमध्ये वाहतूक विभागातील  कमीत कमी दररोज बेस्टचे चालक,वाहक आणि इतर कर्मचारी मिळून सात हजार कर्मचारी कार्यरत असतात. त्याना या लॉकडाऊन काळात ३०० रुपये  प्रोत्साहन भत्ता  देण्यात येणार आहेत. म्हणजे ४० दिवसात जवळ जवळ ८ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोझा प्रोत्साहन भत्यामार्फत तोट्यातील बेस्टला बसणार आहेत. तसेच बेस्टने घेतलेल्या भाडेतत्वारील एसी बसेसच्या आसने काढून अन्न पुरवठा केला जात आहे. त्याचेही पैसे बेस्टला किलोमीटर प्रामणे द्यावे लागणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात बेस्टला १०० कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.

लॉकडाऊन काळात बेस्टला झालेल्या संपूर्ण तोट्या राज्य सरकारने भरून द्यायला पाहिजे. कारण कि, राज्य सरकारचा सूचनेनुसार या सेवा महानगरपालिकेचा मार्फत पुरविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हे संकट जाताच राज्य सरकारने आणि महानगरपालिकेने विनाअट आणि बेस्टच्या कामगिरी लक्षात घेऊन १०० कोटी रुपये बेस्ट प्रवाशांनाला द्यावेत.- सुनील गणाचार्य, वरिष्ठ  बेस्ट समिती सदस्य

 

First Published on: April 17, 2020 8:34 PM
Exit mobile version