CoronaVirus: एअर इंडियाच्या त्या पाच पॉझिटिव्ह वैमानिकांचा अहवाला चुकीचा!

CoronaVirus: एअर इंडियाच्या त्या पाच पॉझिटिव्ह वैमानिकांचा अहवाला चुकीचा!

एअर इंडिया एक्सप्रेस (प्रातिनिधिक छायाचित्र)

एअर इंडियाच्या पाच वैमानिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. पण या वैमानिकांची दुसरी चाचणी केली असता कोरोनाची लागण झाले नसल्याचे उघडकीस आले आहे. शनिवारी या वैमानिकांचा आलेला अहवाल चुकीचा असल्याचे सांगितले जात आहे. खबरदारी म्हणून सर्व वैमानिकांची पुन्हा तपासणी केली गेली आहे. दुसऱ्यांदा तपासणी केल्यानंतर कोणीही कोरोना पॉझिटिव्ह नसल्याचे समजले आहे. याचा अहवाल सोमवारी रात्री आला होता.

दरम्यान या वैमानिकांच्या व्यतिरिक्त इतर दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. परंतु त्यांचा अहवाल स्पष्ट झाला नसून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. रविवारी एअर इंडियाच्या पाच वैमानिका कोरोनाची लागण झाली होती. मग एकामागून एक त्यांची तपासणी केली होती.

माहितीनुसार, आरटी-पीसीआर चाचणी दरम्यान सर्व वैमानिक एका रांगेत बसले होते. कोणत्याही वैमानिकांला कोरोनाची लागण झाली नसल्यामुळे ज्या किटच्या माध्यमातून त्यांची चाचणी करण्यात आली त्यात काही सदोष असल्याचे सांगितले जात आहे.

हे सर्व वैमानिक आणि कर्मचारी २० एप्रिल रोजी चीनहून परत आलेल्या विमानात सहभागी होते. पुढील विमान उड्डाण करण्यापूर्वी मुंबई विमानतळावर सर्व कर्मचाऱ्यांसह वैमानिकांची चाचणी करण्यात आली आणि बीएमसीच्या अधिकाऱ्यांना पाठविली गेली.

आज महाराष्ट्रात १ हजार २६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २४ हजर ४२७ झाली आहे. तसेच आज राज्यात ५३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २८, पुण्यात ६, पनवेलमध्ये ६ , जळगावमध्ये ५ , सोलापूर शहरात ३, ठाण्यात २, रायगडमध्ये १, औरंगाबाद शहरात १, आणि अकोला शहरात १ मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या ९२१ झाली आहे.


हेही वाचा – LockDown: येऊरच्या जंगलावर ड्रोनची करडी नजर


 

First Published on: May 12, 2020 9:23 PM
Exit mobile version