CoronaVirus – पालिकेचा शोध सुरू, क्वारंटाईन सांगितलेले १२०० प्रवासी गायब!

CoronaVirus – पालिकेचा शोध सुरू, क्वारंटाईन सांगितलेले १२०० प्रवासी गायब!

सध्या मुंबईत करोनाचा संसर्ग झालेल्या रूणांची सर्वाधिक संख्या जास्त आहे. २२ मार्चला परदेशातून मुंबईत परतलेल्या प्रवाशांना महापालिकेनं तयार केलेल्या खोल्यांमध्ये किंवा घरीच क्वारंटाइनमध्ये राहण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र या प्रवाशांमधील १२०० प्रवासी सध्या गायब झाले आहेत. ते कुठे आहेत याचा पत्ताच पालिकेला नाहीये. त्यामुळे त्यांचा शोध घेणं हे पालिकेसमोर मोठं आव्हान आहे. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर परदेशातून आलेल्या २०० प्रवाशांना होम क्वारंटाइन राहण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र होम क्वारंटाइनमध्ये राहण्याची सूचना दिलेल्या प्रवशांपैकी १२०० प्रवासी कुठे आहेत? हे महापालिकेला माहितीच नाहीये. याहून धक्कादायक म्हणजे त्यांनी दिलेले फोन नंबर लागत नसल्याचं अधिकाऱ्यांच म्हणणं आहे.

तीन श्रेणीत केली होती विभागणी

मुंबई महापालिकेनं १६ मार्चला २४ डॉक्टरांचं पथक तयार केलं होतं. एका पथकात आठ डॉक्टरांचा समावेश आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचं काम या पथकाचं होतं. तपासणीनंतर प्रवाशांची तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली होती. यात ज्यांना कोरोनासदृश्य लक्षणं होती अशांना अ आणि ज्यांना लक्षणं नव्हती पण, कोरोना होण्याची शक्यता आहे अशांना ब गटात वर्गीकरण करण्यात आले. प्रवाशांना महापालिकेच्या क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगण्यात आलं.

त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का

ज्या प्रवाशांना पालिकेने होम क्वारंटाइन राहण्यास सांगितलं आहे. त्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात आला होता. हे प्रवासी मुंबई आणि महाराष्ट्राच्या विविध भागातील रहिवाशी आहेत. दरम्यान, महापालिकेनं त्यांचा पाठपुरावा सुरू केला असता तब्बल १२०० प्रवाशांशी संपर्क होत नसल्याचं समोर आलं. तर सात जणांना कोरोनासदृश्य लक्षणं दिसून आल्यानं कस्तुरबा रुग्णालयात दाखल होण्यास सांगण्यात आलं आहे.

First Published on: March 30, 2020 8:09 AM
Exit mobile version