राज्यभरात आज अडीच हजारांहून जास्त रुग्ण सापडल्यामुळे कोरोनाभोवतीची भिती अधित वाढली असून मुंबईत देखील तोच कित्ता गिरवला गेला आहे. राज्यात आज सापडलेल्या एकूण २६८२ रुग्णांपैकी तब्बल १४३७ नवे रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत. त्यामुळे आता मुंबईतल्या कोरोनाबाधितांचा आकडा ३६ हजार ७१० झाला आहे. त्यासोबतच मुंबईत आज ३८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतल्या मृतांचा आकडा देखील ११७३ झाला आहे. मुंबईत कोरोनाला मात दिलेल्या रुग्णांची संख्या मात्र वाढून १६ हजारांच्या वर गेली आहे. आज एकूण ७१५ रुग्णांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले. त्यामुळे आता मुंबईतल्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा १६ हजार ८ इतका झाला आहे.