Coronavirus: वीटभट्टी कामगारांचे कुटूंब कबिल्यासह गावाकडे पायी स्थलांतर

Coronavirus: वीटभट्टी कामगारांचे कुटूंब कबिल्यासह गावाकडे पायी स्थलांतर

कामगारांचे स्थलांतर

कोरोनोच्या धसक्याने संपूर्ण देश लाॅकडाऊन झाला असून यांचा सर्वाधिक फटका हातावर पोट असणाऱ्या नाका कामगार, बांधकाम कामगार यांना बसला आहे. कल्याण तालुक्यातील वीटभट्टी कामगारांचे कुटूंब कबिल्यासह गावाकडे स्थलांतर सुरू केले असून दिवस रात्र पायी चालत ते पोहचणार आहेत.

कल्याण तालुक्यात मोजक्याच गावात वीटभट्टी व्यवसाय सुरू आहे. कांबा पावशेपाडा पळसोली, गेरसे कोसला, यासह हाजीमंलग नेवाळी, अंबरनाथ बदलापूर येथे काही प्रमाणात वीटभट्टी आहे. येथे काम करणारे मजूर हे शक्यतो शहापूर तालुक्यातील, भातसई, वाशिंद, डोंगरी, शेरे, आंबार्जे, चिखले, मासवण, मढ खातीवली, बावघर, पाषाण, कलमपाडा, बोराडपाडा, रास, दरोचापाडा, यासह डोंलखांब, आजा पर्वत या पट्टयातील काही आदीवाशी वाड्या वस्त्या मधील कातकरी समाज आणि आदी परिसरातील आदीवाशी, कातकरी समाजातील लोक कुंटूबासह वीटभट्टीवर काम करतात. काही मजूर तर आगाऊ रक्कम घेऊन वीटभट्टीवर काम करतात.याच्यासह नाका व बांधकाम विभागात काम करणारे मजूर देखील कुंटूबकबिला घेऊन कामावर येतात.

पण देशावर आलेल्या कोरोनोच्या संकटामुळे देश लाॅकडाऊण करण्यात आला आहे. राज्य शासनाने कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाबंदी केली आहे. २१ दिवसाच्या लाॅकडाऊण मुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. काम नाही, गाडी नाही त्यामुळे हे कामगार आप आपल्या कुंटूबाला घेऊन पायी चालत भातसई येथे येण्यासाठी नेवाळी येथून निघाले आहेत यांना विचारले असता ते म्हणाले आम्ही नेवाळी येथील वीटभट्टीवर काम करत होतो पण काम बंद झाल्यामुळे दिवसरात्र पायी चालत प्रवास करत आहे. आज मढ येथे राहणार असून उद्या भातसई येथे जाणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व चालत असताना यांच्या कडे मास्क किंवा इतर कोणत्याही प्रकारची सुरक्षा दिसून येते नव्हती. त्यामुळे पोटाच्या आगीपुढे कोरोनाची भिती नगण्य वाटत होती. पण कोरोनाचा धोका किती भयानक आहे हे त्यांना माहीत नाही असे वाटत होते.

First Published on: March 28, 2020 9:24 PM
Exit mobile version