CoronaVirus – कोरोना पॉझिटिव्ह आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या १०० वर!

CoronaVirus – कोरोना पॉझिटिव्ह आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या १०० वर!

धारावीत तपासणी करताना आरोग्य कर्मचारी

मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आता मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. मुंबईत आणखी पाच आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाचे रूग्ण सापडल्याने दक्षिण मुंबईतील एक नर्सिंग होम आठ दिवसांपूर्वीच बंद करण्यात आले होते. मात्र त्यात आरोग्यकेंद्रात काम करणाऱ्या ४० कर्माचाऱ्यांची कोरोनाची टेस्ट करण्यात आली नव्हती.

डोंगरीतील साबू सिद्दीती रूग्णालयात एका रूग्णाला कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात येताच आरोग्य विभागाने ४ एप्रिलला रूग्णालय सील केलं. तेव्हापासून रूग्णालयात ४० कर्मचारी राहत होते. या रूग्णालयात दररोज पालिकेचे अधिकारी यायचे आणि सँपल घेऊन जाणार असे सांगायचे. मात्र अद्याप कोणाचीही कोरोनाची टेस्ट करण्यात आली नव्हती.

या आधी ठाण्यातील गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, ब्रीच कँडी, केईएम आणि कुर्ला भाभा रूग्णालयातील प्रत्येक क नर्स आणि जसलोक हॉस्पिटलमधील एका परिचारिकेला कोरोनाची लागण झाली आहे. या सर्व रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले होते., एकूण करोना पॉझिटिव्ह आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या १०० वर गेली आहे.


हे ही वाचा – धारावीत कोरोनाचे १५ नवीन रूग्ण, रूग्णसंख्या ४३ वर!


 

First Published on: April 12, 2020 9:43 AM
Exit mobile version