करोनाची धास्ती; सरकारी कार्यालयाची उपस्थिती ५०-५० टक्क्यांवर आणणार – मुख्यमंत्री

करोनाची धास्ती; सरकारी कार्यालयाची उपस्थिती ५०-५० टक्क्यांवर आणणार – मुख्यमंत्री

महाराष्ट्र राज्य मंत्रालय

जगात धुमाकूळ घालणाऱ्या करोना व्हायरसने आता महाराष्ट्रात हात पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. हा करोना व्हायरस आता मुंबईत येऊन दाखल झाला आहे. या करोना व्हायरसमुळे आज मुंबईत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता देशात मृतांची संख्या तीनवर गेली आहे. तर राज्यात ४१ करोनाच्या रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून राज्य सरकारकडून सरकारी कार्यालयाची उपस्थिती ५०-५० टक्क्यांवर आणणार असल्याचा निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सरकारी कार्यालयांना सात दिवसांची सुट्टी नाहीच!

सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सात दिवस सुट्टी राहणार. अशाप्रकारीची बातमी पसरली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता सरकारी कार्यालयांना सात दिवसांची सुट्टी न देता. ५०-५० टक्क्यांवर काम करण्याचा विचार सुरू आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मंत्रालयातील अधिकाऱ्याचा रिपोर्ट निगेटिव्ह

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा, कॉलेजला ३१ मार्चपर्यंत सुट्टी दिली आहे. तसेच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. इतकचं नाही तर मंत्रालयात सर्वसामान्य लोकांना येण्यास मज्जाव घातला आहे. यायतच मंत्रालयातील एक अधिकारी करोनाच्या चाचणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली होती. काही दिवसांपूर्वी या अधिकाऱ्याचा भाऊ आणि वहिनी अमेरिकेहून आले होते. मात्र, या अधिकाऱ्याचा करोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

दरम्यान, करोनाच्या धास्तीने सरकारी कार्यालये देखील काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता असून याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. शासकीय कार्यालयातील लोकांची गर्दी टाळण्यासाठी सरकार विचार करत आहे.


हेही वाचा – पुणे : तीन दिवस दुकाने राहणार बंद; व्यापारी असोसिएशनचा निर्णय


 

First Published on: March 17, 2020 6:31 PM
Exit mobile version