marriage registration : मुंबईत कोरोनामुळे विवाह नोंदणी बंद

marriage registration : मुंबईत कोरोनामुळे विवाह नोंदणी बंद

मुंबईत कोरोनाच्या ओमायक्रॉन या नवीन विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच पालिका कार्यालयात विवाह नोंदणीसाठी गर्दी वाढत असल्याने पालिकेने सध्या विवाह नोंदणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र लग्न नोंदणीसाठी लवकरच ऑनलाईन अपॉइंटमेंट दिल्या जातील त्यानंतर विवाह नोंदणी सुरू होईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मुंबईत ओमायक्रॉन रुग्ण संख्येत अधिक वाढ होऊ नये यासाठी पालिकेने काही कठोर उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याअनुषंगाने पालिकेने प्रशासकीय कार्यालयात बाहेरील व्यक्तींना प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. पालिकेने विवाह नोंदणी काही कालावधीसाठी बंद केली आहे.

मुंबईकरांना विविध नागरी सुविधा पुरवणाऱ्या मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे २४ प्रभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रामार्फत विवाह, जन्म आणि मृत्यूची नियमितपणे नोंद केली जाते. मात्र विवाह नोंदणीप्रसंगी, वर, वधू, लग्नाला उपस्थित व्यक्ती या साक्षिदार म्हणून पालिकेच्या संबंधित कार्यालयात उपस्थित राहतात. अशी नोंदणी करण्यासाठी एकाच वेळी ३ – ४ वर, वधू, त्यांचे नातेवाईक, साक्षिदार हे पालिकेच्या कार्यालयात उपस्थित राहिल्यास मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण होऊन त्यामुळे कोविड, ओमायक्रॉनची लागण इतरांना होण्याची दाट शक्यता असते.

मुंबईत कोविडची तिसरी लाट आली असून रुग्णसंख्या आणखीन वाढ होऊ नये यासाठी पालिकेने कार्यालयात गर्दी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच, पालिकेने विवाह नोंदणी बंद केली आहे. तशी माहिती एका ट्विटद्वारे देण्यात आली आहे. मात्र लवकरच अपॉइंटमेंट आणि ऑनलाईन केवायसीची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.


Mumbai Corona Update: मुंबईकरांना दिलासा! कोरोना रुग्णसंख्या 1939 ने घटली, तर १५ हजार रुग्णांना डिस्चार्ज


First Published on: January 17, 2022 9:23 PM
Exit mobile version