मुंबईच टेन्शन वाढलं! धारावीत कोरोना पॉझिटीव्ह रूग्णसंख्या दुप्पट

मुंबईच टेन्शन वाढलं! धारावीत कोरोना पॉझिटीव्ह रूग्णसंख्या दुप्पट

मुंबईच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीत आज बुधवारी धक्कादायक अशी आकडेवारी धारावीतून समोर आली आहे. आज बुधवारी झालेल्या कोरोना रूग्णांच्या चाचण्यांमध्ये धारावीत रूग्णसंख्या ही दुप्पट झाली असल्याची आकडेवारी आहे. धारावीत गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या चाचणीला सुरूवात झाली आहे. अशातच धारावीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. गेल्या काही दिवसांपासून धारावीत रूग्णसंख्येने पुन्हा एकदा डोक वर काढले होते. अशाचवेळी धारावीत बुधवारी रूग्णसंख्या दुप्पट झाल्याने मुंबईकरांच्या टेंनशनमध्ये वाढ झाली आहे. धारावीत मंगळवारी २८ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडले होते. त्यानंतर मात्र धारावीत बुधवारी मात्र कोरोना रूग्णांची संख्या ही ६२ वर गेली आहे. त्यामुळेच धारावीतील वाढती रूग्णसंख्या ही मुंबईकरांचे टेन्शन वाढवणारी अशी आहे.

धारावीत कोरोनावर मिळवलेल्या नियंत्रणासाठी धारावी पॅटर्नचे जागतिक पातळीवर कौतुक झाले होते. पण गेल्या काही दिवसांमध्ये धारावीत सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाला मात्र तितकासा प्रतिसाद मिळालेला नाही. पण कोरोना लसीकरण मोहीम राबवतानाच धारावीत पुन्हा एकदा कोरोना चाचण्यांची संख्याही वाढलेली आहे. त्यामुळेच धारावीत एकाच दिवसात दुप्पट झालेली रूग्णसंख्या ही धारावीचे टेंशन वाढवणारी आहे. धारावीमध्ये सरकारी यंत्रणेकडून लसीकरणाची मोहीम वाढवण्यासाठीही सध्या पथनाट्ये, घरोघरी पोहचून जनजागृती अशा अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. पण त्याचवेळी रूग्णसंख्या ही डोक वर काढताना दिसल्याने धारावीकरांची चिंता वाढलेली आहे. धारावीत ६२ नवीन कोरोना रूग्ण तर त्यापाठोपाठ माहीममध्ये ८६ नवीन कोरोना रूग्ण आढळले आहेत.

धारावीत ८९ जणांचेच लसीकरण

धारावीतील मोठ्या प्रमाणातील लोकसंख्या पाहता धारावीत मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णांच्या लसीकरणासाठीचा प्रतिसाद मिळणे अपेक्षित होते. पण दोन दिवस उलटूनही धारावीत ८९ जणांनी कोरोनाची लस घेतली असल्याचे समोर आले आहे. धारावीत लसीकरणाच्या मोहीमेचा दुसरा दिवस आहे. पण धारावीत कोरोनाच्या लसीकरणासाठी सामान्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. म्हणूनच धारावीकरांना लस घेण्यासाठी महापालिकेला नवनवीन शक्कल लढवावी लागत आहे. धारावीत कोरोना लसीकरणासाठी महापालिकेने होम टू होम मोहीम राबवली आहे. तर पथनाट्याच्या माध्यमातूनही जनजागृती करण्याचा महापालिकेचा मानस आहे.


 

First Published on: March 24, 2021 6:09 PM
Exit mobile version