खाकीतल्या अधिकाऱ्याने धारावीत कोरोनाला हरवले; पण मृत्यूने गाठलेच

खाकीतल्या अधिकाऱ्याने धारावीत कोरोनाला हरवले; पण मृत्यूने गाठलेच

सहाय्यक पोलिस आयुक्त रमेश नांगरे

राज्यभरासह मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढताना दिसतोय. मुंबईतील धारावीत पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. धारावी सारख्या भागात कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ निश्चितच चिंता वाढवणारा आहे. कारण या भागात दाटीवाटीने लोकवस्ती आहेत. त्यामुळे कोरोनाचा झपाट्याने संसर्ग होण्याची शक्यता येथे जास्त आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा प्रदुर्भाव वाढता असल्याने धारावी हे कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलं होतं. त्यामुळे प्रशासनाने येथे विशेष काळजी घेतली होती. मात्र या कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या तत्कालीन धारावीतील पोलीस स्टेशनचे निरीक्षक आणि सहाय्यक पोलिस आयुक्त रमेश नांगरे यांचं निधन झाले असल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धारावीतील पोलीस स्टेशनचे निरीक्षक आणि सहाय्यक पोलिस आयुक्त रमेश नांगरे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तर रमेश नांगरे यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वीच कोरोनाची लस घेतली होती. तसेच धारावी पोलीस स्टेशनचे निरीक्षक आणि सहायक पोलिस आयुक्त रमेश नांगरे यांनी कोरोना दरम्यान आपली उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. याच कामगिरीची दखल घेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहाय्यक पोलिस आयुक्त रमेश नांगरे यांचा सत्कार केला होता.

जागतिक पातळीवर धारावी पॅटर्नची नोंद

मुंबईत पहिला कोरोना रुग्ण ११ मार्च २०२० रोजी सापडला. त्या तुलनेत धारावीमध्ये १ एप्रिल २०२० रोजी म्हणजेच मुंबईतील कोरोना रुग्णानंतर ३ आठवड्यांनी आढळला. मुंबईत कोरोनाचा कहर सुरू असताना दाट लोकवस्ती असलेल्या धारवी या ठिकाणी कोरोना नियंत्रणात आणण्यास धारावीला ‘धारावी पॅटर्न’ राबविल्यानंतर यश आलं होतं. याच पार्श्वभूमीवर जागतिक बँकेने मुंबईतील धारावीमध्ये झालेल्या कोरोना नियंत्रणाच्या कामाचं कौतुक देखील केलं होतं. जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या धारावीत लोकसहभाग, स्थानिक स्तरावरील उपाययोजना यांचा उपयोग करुन प्रभावीपणे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखल्याचे मत जागतिक बँकेने व्यक्त केलं होतं. जागतिक बँकेच्या एका अहवालात मुंबईतील कोरोना नियंत्रणाची विशेष दखलही घेण्यात आली होती. जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक बँकेपाठोपाठ आणखी एका बड्या संस्थेने धारावीच्या कोरोना पॅटर्नची दखल घेतली होती. कोरोना रोखण्यासाठी सर्वांनीच धारावीकडून धडे घेण्याचा सल्ला ऑक्सफर्ड विद्यापीठाने दिला होता.

First Published on: March 11, 2021 2:44 PM
Exit mobile version