‘कोविड’ उपाययोजनांमध्ये सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घेणार

‘कोविड’ उपाययोजनांमध्ये सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घेणार

Igatpuri city will be closed for five days

संपूर्ण मुंबईमध्ये सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग आता झोपडपट्टी परिसरांमधून कमी होवून इमारती, सोसायट्यांमधून अधिक प्रमाणात फैलावू लागला आहे. त्यामुळे झोपडपट्टीमध्ये ज्याप्रमाणे कोविड वॉरियर्स तयार करून कोरोनाचा आजार नियंत्रणात आणण्याचा यशस्वी प्रयोग केला, त्याच धर्तीवर  इमारती, सोसायट्यांमधील पदाधिकाऱ्यांना कोविडच्या उपाययोजनांमध्ये सहभागी करून त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी टाकली जाणार आहे. यापुढे सोसायटीच्या स्तरावरच प्रतिबंधात्मक उपाययोजनासंदर्भातील  नियोजन आणि अंमलबजावणीत महत्वाची भूमिका सोपवली जाणार आहे. त्यादृष्टीकोनातून महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सर्व विभागीय सहायक आयुक्तांना निर्देश दिले आहेत.

‘कोरोना कोविड १९’ या संसर्गजन्य आजाराच्या बाधितांचे प्रमाण महापालिकेच्या काही विभागांच्या क्षेत्रातील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये अर्थात सोसायटींमध्ये वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सोसायटींच्या स्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजन विषयींचे नियोजन व अंमलबजावणी यात संबंधित सोसायटींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने सोसायटींच्या पदाधिकाऱ्यांना सदर कामात सहभागी करुन घ्यावे, असे निर्देश सर्व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना दिले आहे. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातून दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष बैठकीदरम्यान महापालिका आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. या बैठकीला महापालिकेच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्य शासनातील सहकारी गृहनिर्माण संस्थाविषयक संबंधित उपनिबंधक देखील उपस्थित होते.

‘कोविड कोरोना १९’ या संसर्गजन्य आजाराच्या प्रसारास प्रतिबंध मुंबई महानगरपालिकेद्वारे प्रभावी जाणीवजागृती करिता नियमितपणे प्रयत्न करण्यात येत असून यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. याच श्रृंखलेत आता प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने महापालिका क्षेत्रातील सोसायटींच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी सर्व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

First Published on: June 18, 2020 9:19 PM
Exit mobile version