दादर परिसरात ड्रेनेजमध्ये अडकली गाय; बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न

दादर परिसरात ड्रेनेजमध्ये अडकली गाय; बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न

ड्रेनेजच्या टाकीत चक्क गाय अडकल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबईतील दादर परिसरात असलेल्या कबुतर खानाजवळील एका ड्रेनेजच्या टाकीत गाय अडकली आहे. या संदर्भात माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत गाईला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत.

मुंबईच्या दादर हा परिसरातील भवानी शंकर रोडवरील एका ड्रेनेजमध्ये गाय पडली. सोमवारी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गाईचे वजन अधिक असल्यानं तिला धोरीच्या सहाय्यानं बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि मुंबई महापालिकेचे कर्मचारी दाखल झाले आहेत. तसंच या गाईला बाहेर काढण्यासाठी या ड्रेनेज टाकीच्या आजुबाजूचा परिसर हातोडा मारून तोडला जात आहे.

मिळालेल्या महितीनुसार, संबंधित गाय ही ड्रेनेज टाकीच्या बाजूलाच उभी होती. त्यावेळी अचानक ड्रेनेजच्या टाकीचे झाकण सरकलं आणि ही गाय त्यामध्ये पडली. यासंदर्भात माहिती मिळताच तेथील उपस्थित स्थानिक गाईला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु, मागील तासाभरापासून ही गाय त्या ड्रेनेज टाकीच्या टाकीत अडकून पडली आहे. दरम्यान, भवानी शंकर रोड परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे.

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळाची दखल घेत अग्निशमन दलाचे जवान आणि महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.


हेही वाचा – आदित्य ठाकरेंचा कोकण दौरा; नितेश राणेंच्या मतदारसंघात करणार एन्ट्री

First Published on: March 28, 2022 9:43 AM
Exit mobile version