सीएसएमटी पूल दूर्घटना – भावाकडून पैसे आणायला जाणं पडलं महागात

सीएसएमटी पूल दूर्घटना – भावाकडून पैसे आणायला जाणं पडलं महागात

सीएसएमटी पुल दुर्घटनेनंतर मलबा हटवताना सामान्य नागरिक

चार महिन्यांपूर्वी अॅन्जिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झालेले जयेश अवलानी हे पुन्हा जीटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. कारण आहे सीएसएमटी पूल दूर्घटना. सीएसएमटी पूल दूर्घटनेत जखमी झालेले जयेश अवलानी यांच्या जबड्याला आणि कंबरेला जबर मार बसला आहे. जयेश अवलानी (४६) यांची चार महिन्यांपूर्वीच गोकुळदास तेजपाल हॉस्पिटलमध्ये अॅन्जिओप्लास्टी झाली होती. गुरुवारी सायंकाळी महमद अली रोडवर एका नातेवाईकाकडून पैसे घेण्यासाठी भेटायला जात असताना ते या दुर्घटनेत सापडले.

कसा घडला प्रकार

जयेश अवलानी आणि चेतना अवलानी हे डोंबिवलीत राहतात. जयेश सेल्समनचे काम करतात. जयेश हे त्यांच्या नातेवाईकांना भेटायला या ब्रिजवरुन जात असताना ही घटना घडली. त्यानंतर, चेतना यांच्या आईला या अपघाताची माहिती दिली आणि त्यांनी तातडीने जीटी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. दरम्यान या अपघातात जयेश यांची बॅग हरवल्याचे चेतना यानी सांगितले.

‘घडलेली घटना दुःखदायक असून आमच्या कुटुंबियावर दुःख कोसळले आहे. मी काॅल सेंटरमध्ये कामाला आहे. मात्र आम्ही जेमतेम स्थितीत कुटुंब चालवत आहोत. जयेश सेल्समन असल्याने त्यांच्या बॅगेत चार ते पाच हजाराची रक्कम होती. तसेच काही चेक होते. त्यासाठी आता पोलिस ठाण्यात करणार आहोत.’ – चेतना अवलानी, जयेश अवलानी यांच्या पत्नी

जयेश अवलानी यांच्या जबड्याला जबर मार बसला असून ६ टाके पडले आहेत. पायाला देखील लागलं असून त्यांच्यावर गुरुवारी रात्री उशिरा शस्त्रक्रिया केल्याचं जयेश यांच्या सासू शारदा राठोड यांनी सांगितले.

First Published on: March 15, 2019 8:14 PM
Exit mobile version