Dadar News : दादरमध्ये 1 लाख 80 हजार रुपयांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई

Dadar News : दादरमध्ये 1 लाख 80 हजार रुपयांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. राजकीय नेते मंडळी प्रचारसभा, रॅलीत व्यस्त आहेत. अशात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून धडक कारवाई केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक भरारी पथकाने दादरमध्ये कारवाई केली आहे. दादर पूर्व येथे असलेल्या शिंदे वाडी परिसरत लाखो रुपयांची रोकड निवडणूक भरारी पथकाने जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. (Dadar News lok sabha election 2024 cash seized bundle of rs 500 notes by election commission in white car)

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दादर पूर्व येथील शिंदे वाडी परिसरात नाकाबंदी लावण्यात आली होती. त्यावेळी अनेक गाड्यांची तपासणी केली जात होती. त्यात एका पाढऱ्या कारची तपासणी केली असता पोलिसांनी जवळपास 1 लाख 80 हजार रुपयांची रोकड सापडली. निवडणूक भरारी पथकाने भोईवाडा पोलिसांच्या मदतीन ही रोकड जप्त केली. या रोकडबाबत चालकाची चौकशी केली असता, त्याच्याकडे त्यासंदर्भात कोणतीही कागदपत्रे आढळली नाही. त्यामुळे पोलिसांनी निवडणूक भरारी पथकाच्या मदतीने कारवाई केली आहे.

निवडणूक काळात प्रामुख्याने रोकड, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तूंची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांच्या अवैध वाहतुकीवर निवडणूक आयोग लक्ष ठेवून आहे. मुंबईत राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून तसेच बाहेरील राज्यांमधून दररोज अनेक गाड्या ये-जा करत असतात. त्या गाड्यांमधून पैशांची वाहतूक होण्याची शक्यता असते. त्यापार्श्वभूमीवर मुंबई शहर, उपनगर तसेच मुंबई लगतच्या शहरांमधील एन्ट्रीवर नाकाबंदी करण्यात आली असून, गाड्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

निवडणुकीच्या काळात मतदारांना भुलवण्यासाठी प्रामुख्याने रोकड, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तूंचा वापर केला जातो. हा अवैध कारभार रोखण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे अनेक ठिकाणी तपासणी नाके (नाकाबंदी) उभारले जात असून संशयित वाहनांना थांबवून त्यांची तपासणी केली जाते.

भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड जप्त

भांडूप येथील सोनापूर सिग्नलवरील वाहनात शनिवारी २७ एप्रिल रोजी मध्यरात्री तीन ते साडे तीन कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. ही रोकड रक्कम सध्या भांडूप पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली आहे. पोलीस स्टेशनमध्ये आयकर विभागाचे पथक दाखल होत त्यांनी जप्त केलेल्या रोकडची मोजणी केली. आयोगाच्या भरारी पथकाने पकडलेली गाडी एटीएमचे पैसे वाहतूक करण्याऱ्या गाडीसारखी होती. परंतु, गाडीतील ही रक्कम कुठे जात होती, ती रक्कम कोणाची आहे, यासंदर्भात काहीच उत्तरे गाडी चालकाने दिली नाही, त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.


हेही वाचा – Lok Sabha 2024 : सध्याच्या राज्यकर्त्यांचे सगळेच उफराटे, ठाकरे गटाचे टीकास्त्र

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 29, 2024 5:23 PM
Exit mobile version