मालाड दुर्घटनेनंतर दहिसरमध्ये घरे कोसळली, तोडगा काढण्यासाठी ठाकरे सरकारला दरेकरांचे निवेदन

मालाड दुर्घटनेनंतर दहिसरमध्ये घरे कोसळली, तोडगा काढण्यासाठी ठाकरे सरकारला दरेकरांचे निवेदन

मालाड दुर्घटनेनंतर दहिसरमध्ये घरे कोसळली, तोडगा काढण्यासाठी ठाकरे सरकारला दरेकरांचे निवेदन

कांदिवली (पू) भागातील पाडे/वस्त्या व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमधील नागरिकांच्या मूलभूत सुविधा तसेच पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, याचा पाठपुरावा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. या वस्त्यातील नागरिकांची व लोकप्रतिनिधी म्हणून माझी, आता सहनशक्ती संपली असून उपोषणाशिवाय सरकारला जाग येणार नाही असे दरेकरांनी म्हटले आहे. वस्त्यातील नागरिकांसह दरेकर यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य वनसंरक्षक तथा संचालकांची भेट घेऊन निवेदन दिले. परिसरातील नागरिकांच्या जीवीताचा, आता सहनशक्ती संपली असून उपोषणाशिवाय सरकारला जाग येणार नाही असा इशारा दरेकरांनी दिला आहे.

मालाड येथील इमारत दुर्घटना ताजी असतानाच, दहिसर (पूर्व) येथील केतकीपाड्यामध्ये तीन घरे कोसळली ही दुर्घटना दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चव्हाण चाळ, शंकर मंदिराजवळ घडली. यामध्ये प्रद्युम्न सरोज नावाच्या २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. दामू नगर, भिमनगर, गौतम नगर, लहूगड, रामगड, सातारा केंम्प, गांधी नगर, पांडे कंम्पाऊंड, जानूपाडा, कांदिवली (पूर्व), मुंबई. केतकीपाडा, सावित्रीबाई फुले नगर, राम नगर, शिवाजी नगर, वायंगणकर वाडी, महाराष्ट्र खदान, कानडे मैदान, दहिसर (पूर्व), तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाडे येथील हजारो नागरिक आजही जीव मुठीत घेवून राहत आहेत. या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. या नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने पत्राद्वारे मागण्या केल्या आहेत.

दहिसर (पूर्व) येथील केतकीपाडा, सावित्रीबाई फुले नगर, राम नगर, शिवाजी नगर, वायंगणकर वाडी, महाराष्ट्र खदान, कानडे मैदान व कांदिवली (पूर्व) येथील दामू नगर, भिमनगर, गौतम नगर, लहूगड, ‘रामगड, सातारा कॅम्प, गांधी नगर, पांडे कंम्पाऊंड, जानूपाडा तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील . आदिवाशी पाडे या परिसरातील सर्व घरांचे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सर्वेक्षण करण्यात यावे, व सदर सर्वेक्षण पावसाळा लक्षात घेता. तात्काल करण्यात यावे.

अनाधिकृत पाणी व वीज कनेक्शन सर्व सामान्यांना देवून त्याची काही पाणीमाफिया,वीजमाफिया लूट करीत आहेत व शासनाचा महसूल स्वतःच्या खिशात टाकत आहेत. ही बाब लक्षात घेता सर्वसामान्य नागरिकांची पाणी कनेक्शन व वीज कनेक्शन अधिकृत करण्यात यावी, तसेच आजपर्यत नागरिकांची लूट झाली आहे ती सर्व सामान्य नागरिकांना परत मिळावी, जी सर्वसामान्य नागरिकांची लूट झाले सदर समस्या सोडविण्यासाठी गत दीड वर्षापासून मी सातत्याने पत्रव्यवहार केला आहे.

तसेच परंतु सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. सदर समस्या तात्काळ सोडविणे गरजेचे आहे. सबब, सदर समस्या तात्काळ करण्यात यावे. अन्यथा मला उपोषणाचा मार्ग अवलंबावा सोडविण्यासाठी कालबद्द नियोजन लागेल याची नोंद घ्यावी असे पत्र प्रवीण दरेकर यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य वनसंरक्षक तथा संचालकांना दिले आहे.

First Published on: June 12, 2021 6:49 PM
Exit mobile version