मालजीपाड्यातील हातभट्टीसह अडीज लाखांचा माल उध्वस्त

मालजीपाड्यातील हातभट्टीसह अडीज लाखांचा माल उध्वस्त

प्रातिनिधिक चित्र

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मालजीपाड्यात धगधगणारी आणखी एक गावठी दारुची हातभट्टी वालीव पोलीसांनी उद्ध्वस्त केली. हातभट्टीचे गांव म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या मालजीपाड्यात गावठी दारुच्या मोठ्या प्रमाणात भट्ट्या लागत होत्या. राज्यात गावठी दारुमुळे अनेकजणांचे बळी गेल्यानंतर या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मालीपाड्यातील खाडी किनारी किंवा घनदाट झाडीत या भट्टया पेटवल्या जात होत्या. दलदलीच्या झाडीत चारही बाजुने पाणी असल्यामुळे भट्टीसाठी दारुमाफियांनी ही जागा निवडली होती. या ठिकाणी जाण्यासाठी बोटीचाच वापर करावा लागत असल्यामुळे पोलीसांच्या कारवाईचीही भिती नव्हती. त्यामुळे पहिल्या धारेचा माल संपुर्ण ठाणे जिल्हा आणि मुंबईत सुखरुप पोहचता केला जात होता.लोकल ट्रेनमधून नायंगांव-भाईंदर असा प्रवास करताना या झाडीतून धुर निघत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे भट्ट्यांचा सुगावा लागला. त्या उद्ध्वस्त केल्यानंतर नागोबा मंदिराच्या मागील दलदलीत अविनाश पाटील हातभट्टी लावत असल्याची माहिती वालीव पोलीसांना मिळाली होती.

दारु गाळताना रंगेहाथ अटक

त्या आधारे त्यांनी बुधवारी सकाळी 8 वाजता धाड टाकून पाटीलला हातभट्टीवर दारु गाळताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर भट्टी,दारुसाठी वापरण्यात आलेले लाकडे,अल्युमिनियमचे सतेले, प्लास्टीकचे पिंप,पाईप, चाटु,नवसागर मिश्रीत तयार गुळाचा वॉश,14 रबरी ट्युब आणि 560 लिटर दारु आदि 2 लाख 61 हजार 800 रुपयांचा माल जागीच उध्वस्त करण्यात आला.तिथून परतताना या पथकाने गावठी दारु वाहणारी मोटार सायकल पकडून,रबरी ट्युबमधील 80 दारु हस्तगत केली.

First Published on: September 15, 2018 3:00 AM
Exit mobile version