दाऊदचा पुतण्या रिजवान कासकरला अटक; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

दाऊदचा पुतण्या रिजवान कासकरला अटक; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

दाऊद

मुंबई पोलिसांनी बुधवार, १७ जुलैच्या रात्री मोठी कारवाई करत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पुतण्याला अटक केली आहे. मुंबई क्राईम ब्रांचच्या खंडणी विरोधी पथकाककडून ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. दाऊदचा पुतण्या रिजवान कासकरला खंडणी मागण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. रिजवान कासकर हा दाऊदचा भाऊ इकबाल कासकरचा मुलगा आहे. रिजवान कासकर देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, छोटा शकीलचा सहकारी अफरोज वदारिया यालादेखील मुंबई पोलिसांनी हवाला प्रकरणी अटक केली होती. याचप्रकरणी दाऊदच्या पुतण्यालाही अटक करण्यात आली आहे. रिजवान कासकर हा दाऊदचा भाऊ इकबाल कासकरचा मुलगा आहे. इकबास कासकरदेखील खंडणीच्या एका गुन्ह्यात सध्या जेलमध्ये आहे.

याआधी अंडरवर्ल्ड डॉन तसेच कुख्यात गुंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दाऊद इब्राहिमच्या विश्वासू सहकाऱ्याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या सहकाऱ्याचे नाव रियाज भाटी असे होते. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने दाऊदच्या या विश्वासात असणाऱ्या सहकाऱ्याला अटक करून ही धडक कारवाई केली होती. तर खंडणी विरोधी पथकाने अहमद रजा यालाही अटक केली होती. अहमद रजा हा या प्रकरणात फरार असणाऱ्या फहीमचा जवळचा सहकारी असून त्याला आंतररराष्ट्रीय विमानतळावरुन अटक करण्यात आली होती. अहमद रजा दुबईहून मुंबईला आला होता आणि रिजवानच्या संपर्कात होता.

हेही वाचा –

राममंदिर प्रकरणी २ ऑगस्टपासून दररोज सुनावणी होणार – सुप्रीम कोर्ट

कर्नाटक : कुमारस्वामींचे सरकार राहणार की जाणार?

First Published on: July 18, 2019 12:46 PM
Exit mobile version