दाऊदची हवेली विकली गेली फक्त ११ लाखात !

दाऊदची हवेली विकली गेली फक्त ११ लाखात !

अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिम याच्या रत्नागिरी खेडमधील मूळगावची हवेली अखेर आज अवघ्या काही लाख रूपयातच लिलाव प्रक्रियेत विकली गेली. याआधी दोनवेळा लिलाव प्रक्रियेला कोणीही प्रतिसाद दिला नव्हता. पण आज झालेल्या लिलाव प्रक्रियेत मात्र अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकरची हवेली अवघ्या ११ लाख रूपयात लिलाव प्रक्रियेत विकली गेली. दाऊदच्या सहा प्रॉपर्टीच्या लिलावाची प्रक्रिया वाणिज्य मंत्रालयाने हाती घेतली होती. त्यापैकी रत्नागिरी येथील मुंबके या गावी दाऊदची हवेली होती. अजय श्रीवास्तव या व्यक्तीला या हवेलीची मालकी मिळाली आहे.

तर आणखी ४ मालमत्ता या दिल्लीस्थित भुपेंद्र भारद्वाज या वकिलाने जिंकल्या आहेत. एकुण ६ जागांसाठी सेफमा म्हणजे स्मगलर्स एण्ड फॉरेन एक्सचेंज मॅनिपुलेटर्स एजन्सीकडून हा लिलाव सुरू आहे. नरीमन पॉईंट येथील सफेमा कार्यालयात ही लिलाव प्रक्रिया सुरू आहे. सहा प्रॉपर्टी या इब्राहिम दाऊदच्या आहेत. तर प्रॉपर्टी ही इक्बाल मिर्ची याची आहे. ई ऑक्शन आणि टेंडरींगच्या प्रक्रियेद्वारे हा लिलाव होणार आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने याआधीच रत्नागिरी जिल्ह्यातील मालमत्तेच्या लिलावाच्या रकमा निश्चित केल्या होत्या. त्यानुसार दाऊदच्या मूळ गाव असलेल्या मुंबके गावातील मालमत्तेची रक्कम १४ लाख ४५ हजार रूपये, तर लोटे येथील आंब्याच्या बागेची किंमत ६१ लाख ४८ हजार रूपये इतकी कमाल रक्कम निश्चित करण्यात आली होती. याआधीही दोनवेळा या जागेचा लिलाव झाला होता, पण कोणीही ही जागा खरेदी करण्यात रस दाखवला नव्हता. याआधीच दाऊदच्या मुंबईतील जागांचा लिलाव झाला होता. त्यापाठोपाठ आता कोकणातील जागेचाही लिलाव करण्यात आला. सध्या ही शेतीचा जागा दाऊदचे काका कसत आहे. पण या जागेचा लिलाव होत असेल तर सरकारी नियमाप्रमाणे व्हावा अशी इच्छा दाऊदच्या काकांनी व्यक्त केली होती.


 

First Published on: November 10, 2020 2:55 PM
Exit mobile version