महालक्ष्मी रेसकोर्स येथे भरधाव कारने एका पादचाऱ्याला उडवलं

महालक्ष्मी रेसकोर्स येथे भरधाव कारने एका पादचाऱ्याला उडवलं

महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ एका वेगात असणाऱ्या कारने पादचाऱ्यांना उडवल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. या अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला असून एक वाहनचालक जखमी झाला आहे. या भीषण अपघातात मर्सिडीज कारच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

हा भीषण अपघात सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडला. महालक्ष्मी रेसकोर्सजवळील या अपघातात एक ठार तर एक जण जखमी झाला आहे. ताडदेव येथे नोकरी करत असलेल्या ४३ वर्षीय राजेंद्र प्रसाद राम याचा या घटनेत मृत्यू झाला. नेहमीप्रमाणे काम संपवून तो अंधेरी येथे त्याच्या घरी जात होता. त्यावेळी कारने त्याला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संपुर्ण घटनेचा तपास सुरू केला आहे.

First Published on: June 4, 2019 9:45 AM
Exit mobile version