डोंगरी दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर; बचावकार्य अजूनही सुरु

डोंगरी दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर; बचावकार्य अजूनही सुरु

मुंबई : डोंगरीत चार मजली इमारत कोसळली

मुंबईतील डोंगरी परिसरात केसरबाई ही चार मजली इमारत काल, १६ जुलै रोजी कोसळली असून आज सकाळपर्यंत या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. तर ९ जण जखमी झाल्याची माहित एनडीआरएफने दिली आहे. या ठिकाणी दुसऱ्या दिवशीही एनडीआरएफ टीमकडून बचावकार्य सुरु असून ढिगाऱ्याखाली आणखी काही लोकं अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मृतांचा किंवा जखमींचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, आतापर्यंत २३ लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात एनडीआरएफ टीमला यश आले आहे.

काय आहे घटना 

मुंबईच्या डोंगरी भागात कौसरबाग इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डोंगरीच्या बाबा गल्लीत चार मजली इमारत कोसळली आहे. इमारतीचा अर्धा भाग कोसळला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटानास्थळी दाखल झाले आहे. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक प्रयत्न करत होते. यानंतर अग्निशमन दलाचे आणि एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले आहे.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी स्निफर डॉग्जची मदत घेतली जात आहे.

First Published on: July 17, 2019 8:38 AM
Exit mobile version